विसापूर येथे आमदार महेश शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार.



विसापूर येथे आमदार महेश शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजनेचे पाणी विसापूर व रेवलकरवाडी ग्रामस्थांना मिळवून दिल्याबद्दल आमदार महेशजी शिंदे साहेब यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा व युवा नेते माननीय हरिश्चंद्र सावंत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. विसापूर,रेवलकरवाडीजाखणगाव,जांब,आमलेवाडी,गादेवाडी तसेच पुढे जाऊन भोसरे व लोणी पर्यंत पाणी मिळणारा आहे मी सर्वप्रथम आपल्याला कशा पद्धतीने कायम स्वरूपात पाणी उपलब्ध होईल याचा अभ्यास करून घेतला तो सर्वे केंद्रीय सचिव यांच्याकडे मांडला यामुळे या योजनेत ही सर्व गावे घालणे शक्य झाले. डोंगराच्या कडेकडेने पाणी जाऊन सुद्धा ०.४० टीएमसी एवढे पाणी शिल्लक राहत असल्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघात खूप मोठी कारखानदारी आणण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे व थोड्याच दिवसात या ठिकाणी कारखानदारी येईल आणि मतदार संघातील सर्व युवकांना रोजगार मिळणार असून आपण लवकरच बेरोजगारीवर मात करू शकतो असे आमदार महेशजी शिंदे यांनी सांगितले. दरम्यान कार्यसम्राट आमदार महेशजी शिंदे साहेब व युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये कु.सुमंत उद्धव सावंत, प्रीती सुधीर येवले,मनाली उत्तम सावंत,धनश्री रमेश सावंत व जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणारा  आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मा.सुभाष पवार ,विसापूर ग्रामपंचायत यांना मिळाल्याबद्दल व आदर्श व गुणवंत  शिक्षक पुरस्कार मा. ज्ञानेश्वर धायगुडे मुख्याध्यापक जि.प.शाळा विसापूर  यांना मिळाल्याबद्दल यांचाही सत्कार आमदार साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी साहेबांनी हरिश्चंद्र सावंत यांना शुभेच्छा देताना येणारा काळ आपलाच असून विसापूर मध्ये कोट्यावधींची विकास कामे करणार असल्याचे सूचित केले व पुढच्या वाढदिवसापर्यंत विसापूर मध्ये पाणी आणणार  असा विश्वास सर्व ग्रामस्थांना दिला. यावेळी खटावचे युवा नेते राहुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, भाजपचे जिल्ह्याचे सरचिटणीस भरत मुळे, खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आण्णा वलेकर,बुध चे सरपंच अभयराजे घाटगे,नवनाथ फडतरे,पवारवाडी चे सरपंच महेश पवार, गारवडीचे सरपंच शिवाजी शेडगे, शिवसेना खटाव तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर काटकर उपस्थित होते व विविध गावचे माजी सरपंच   विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन  व  ग्रामस्थ उपस्थित होते . भानुदास फडतरे यांनी प्रस्तावना केली, प्रथमेश सावंत व हर्षद साळुंखे यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार माजी जिल्हाध्यक्ष हरीदास जगदाळे यांनी  तर  संभाजी साळुंखे यांनी सर्वांचे स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.