हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जनक्रांती सांस्कृतिक क्रीडा मंडळचा आदर्श घ्यावा:-API आशिष कांबळे.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले जनक्रांती सांस्कृतिक क्रीडा मंडळचा आदर्श घ्यावा:-API आशिष कांबळे.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

येथील जनक्रांती सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळचे वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने घडवले हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन. मुस्लिम बांधवाने दिली गणेश मूर्ती.
खटाव मधील मोईद्दीन मुल्ला यांनी जनक्रांती मंडळास यावर्षीची मूर्ती स्वेच्छेने देऊन हिंदू मुस्लिम ऐक्य भावनेचा एक अनोखा असा संदेश दिला आहे.
गेली 39 वर्ष या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत खटाव मध्ये एक आदर्श असे मंडळ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या मंडळाच्या जडणघडणीत केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम समाजातील अनेक बांधव सभासद असून त्यांचाही या त मोलाचा वाटा व सहभाग नेहमीच दिसून येतो.एकीकडे राज्यात आणि देशात हिंदू मुस्लिम धर्मा तणाव व तेढ निर्माण होत असताना मात्र ग्रामीण भागातील हिंदू मुस्लिम समाजात असणाऱ्या एकोप्याचे दर्शन या गणेश जयंतीच्या निमित्ताने पहावयास मिळाले. या गणेश मंडळाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी केले व आवर्जून मंडळाला भेट देऊन या मुस्लिम बांधवाचे आभारतर मानलेच व कौतूकही केले. गणेश उत्सव हा सण उत्साहाचा असला तरी या सणाच्या निमित्ताने समाजात निर्माण होत असलेली दरी पाहता मुल्ला यांनी जनक्रांती मंडळास श्री ची मूर्ती देऊन हिंदू मुस्लिम ऐक्य भावना दृढ केल्याचे सांगितले मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल केले. मोईदीन मुल्ला यांनी यावेळी जनक्रांती मंडळाच्या वतीने आत्तापर्यंत सामाजिक सलोखा तसेच सामाजिक उपक्रम राबवत जे आदर्शवत कार्य केले आहे त्या कार्याला प्रेरित होऊन मी व माझ्या कुटुंबाने चालू वर्षी गणेश मूर्ती मंडळाला देण्याचा निर्धार केला होता . गणेश मूर्ती देण्याचा मला मनस्वी आनंद वाटत आहे असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.