विकसित भारत संकल्प यात्रेचा एकंबे येथे उत्साहात प्रारंभ.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव, दिनांक २४: केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेतील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'आपला संकल्प विकसित भारत' या ध्येयास अनुसरून 'विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ तालुक्यातील एकंबे येथे उत्साहात झाला. यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, शासनाच्या विविध विभागांचे विस्तार अधिकारी , कर्मचारी, तसेच ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजना रथाचे पूजन करण्यात आले.* *घरकुल योजना ,उज्ज्वला योजना आयुष्मान भारत इत्यादी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.*
*त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळाला ,याबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या .गटविकास अधिकारी किशोर माने म्हणाले," विविध योजनांचा समाजातील विविध घटकांनी लाभ घ्यावा. ग्रामसेवक, तलाठी इत्यादी अधिकाऱ्यांकडून तसेच पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, इत्यादी ठिकाणांवरून जनतेने सर्व योजनांची माहिती घ्यावी." महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसेच घरकुल योजना, रोजगार हमी योजना ,आयुष्मान भारत इत्यादी योजनांची योजनांचा लाभ कशाप्रकारे मिळाला याबाबत विविध लाभार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंधरा नोव्हेंबर ते 26 जानेवारी दरम्यान ही यात्रा रोज दोन गावांमधून प्रवास करणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभाग, आरोग्य विभाग ,अंगणवाडी विभाग यांनी विविध प्रकारची माहिती देणारे प्रदर्शन तसेच सेवा आयोजित केल्या होत्या. एकंबी सोबत शुभारंभाच्या दिवशी जायगाव येथे या बाबत माहिती देण्यात आली.
Comments
Post a Comment