सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी केले रक्तदान; क्षेत्र माहुली येथे स्वर्गीय राजेंद्र इंगळे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात भावूक झाले आमदार, विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा केला निर्धार.
सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी केले रक्तदान; क्षेत्र माहुली येथे स्वर्गीय राजेंद्र इंगळे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात भावूक झाले आमदार, विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा केला निर्धार.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे निष्ठावंत, कट्टर समर्थक आणि सच्चा पाठीराखा असलेले भारतीय जनता पक्षाचे सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र दगडू इंगळे यांचा स्मृतिदिन बुधवारी क्षेत्र माहुली येथे साजरा करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये स्वत: रक्तदान करत आमदार महेश शिंदे यांनी मित्रत्वाचे नाते जपत मैत्री धर्म निभावला. त्यांनी इंगळे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांसमोर केला. यावेळी ते भावूक झाले होते. यावेळी काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. सौ अरुणाताई बर्गे, सदस्य डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे उपस्थित होत्या.राजेंद्र इंगळे हे अत्यंत कार्यक्षम व हुशार कार्यकर्ते होते. भारतीय जनता पक्षाच्या सातारा तालुकाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी पक्षाची अत्यंत चांगल्या पध्दतीने बांधणी केली. २०१९ च्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत त्यांनी दिवसरात्र एक करत आमदार महेश शिंदे यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी असलेल्या इंगळे यांचा मित्रपरिवार मोठा होता, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचे जाळे देखील मजबूत होते. २०२२ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यांचा स्मृतिदिन बुधवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सातारच्या माऊली ब्लड बँकेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार महेश शिंदे यांनी रक्तदान करत आपला मैत्रीधर्म जपला. यावेळी इंगळे यांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले. तत्पूर्वी सकाळी प्रतिपंढरपूर आंबेघर येथील हरिभक्त परायण प्रवीण महाराज शेलार यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता फुले अर्पण करण्यात आली.
यावेळी मतदारसंघातील सातारा तालुक्यात समाविष्ठ असलेल्या गावांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर आमदार महेश शिंदे यांनी संवाद साधला. त्यांनी राजेंद्र इंगळे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना अपेक्षित असलेला ग्रामीण भागाचा विकास करत असल्याचे सांगितले. क्षेत्र माहुली साठी नव्याने पाणीपुरवठा योजना करावी यासाठी राजेंद्र इंगळे आग्रही होते, त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला असून ही योजना मार्गी लागली असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी क्षेत्र माहुलीसह सोनगाव संमत निंब, महागाव, चिंचणेर वंदन, चिंचणेर संमत निंब, संगम माहुली परिसराच्या विकासामध्ये कोठेही कमी पडणार नसल्याचे स्पष्ट केले.
चौकट : जनसेवेचाच वसा...
आमदार महेश शिंदे हे क्षेत्र माहुली येथे रक्तदान करत असताना मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे कामे देखील मोबाईल वरून करत होते. येणारा प्रत्येक कॉल अटेंड करून सर्वसामान्यांचे काम मार्गी लावत होते, एकूणच आमदार महेश शिंदे हे क्षणभर विश्रांती न घेता मतदार संघातील जनतेसाठी काम करत असल्याचे पाहून जमलेले पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ सुखावले.
Comments
Post a Comment