रविवारी विटा येथे सर्व धर्मीय वधु-वर परिचय महामेळावा.

रविवारी विटा येथे सर्व धर्मीय वधु-वर परिचय महामेळावा.


पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

सात जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगाव-कवठेमहंकाळ यांच्या वतीने रविवार दिनांक १९ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत कृष्णलीला मंगल कार्यालय कराड रोड विटा (ता खानापूर) येथे सर्वधर्मीय वधु-वर परीचय महा मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती सागर पाटील (वायफळेकर) यांनी दिली असून,गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना सागर पाटील पुढे म्हणाले की सकाळी दहा वाजता शिवदर्शन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम (नाना) जाधव यांच्या हस्ते व प्रसिद्ध वक्ते जनार्दन पाटील यांच्या प्रमुख   उपस्थितीत या महामेळाव्याचे उदघाटन होणार आहे.तरी गरजूंनी सदर मेळाव्यास अगदी वेळेत उपस्थित रहाण्याचे आवाहन केले असुन,इच्छुकांनी येताना सोबत बायोडाटा व फोटो आणण्यासही सांगितले आहे.तसेच अधिक माहितीसाठी ९५११६२७१६० या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.