सौ शशिकला भगत यांचं निधन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
जाखणगाव ता. खटाव येथील सौ शशिकला बाबासाहेब भगत यांचे वयाच्या 76 व्या वर्षी वृद्धापकाळाने शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले या शेतकरी नेते तसेच येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत व राजेंद्र भगत यांच्या आई होत.सौ शशिकला भगत या राजकीय क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या महिला होत्या. राजकीय, सामाजिक, लग्न जमवणे, बिघडणारे प्रपंच बसवणे अशा सर्व स्तरात त्यांनी उल्लेखनीय काम केले. गोरगरिबांना मदत करणे, अडीअडचणी सोडवणे तसेच गाव पातळीवरील सामाजिक कामात हिरीरीने पुढाकार घेऊन काम करणाऱ्या धाडसी महिला म्हणून त्यांची परिसरात ओळख होती जाखणगावच्याच शिंदे घराण्यातील माहेरवाशींनी असल्यामुळे गाव पातळीवरील राजकारणात त्यांचा प्रभाव कायम राहिला यामुळे जाखनगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
त्यांच्या पश्चात पती बाबासाहेब तसेच राजेंद्र भगत व संजय भगत अशी दोन मुले आणि सुना नातवंडे असा परिवार आहे सावडण्याचा विधी रविवारी सकाळी जाखणगाव येथे सकाळी नऊ वाजता आहे.
Comments
Post a Comment