सौ शशिकला भगत महिला अष्टपैलू व्यक्तिमत्व होते - माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत.

सौ शशिकला भगत महिला अष्टपैलू व्यक्तिमत्व होते - माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत.
          
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

काही ठराविक महिला राजकीय, सामाजिक  क्षेत्रात ठसा उमटवतात असेच एक धडाडीचे वादळी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ शशिकाला भगत या होत्या त्यांच्या  जाण्याने समाजात कधीही भरून न येणारी  पोकळी निर्माण झाली आहे अशी भावपूर्ण श्रद्धांजली माजी  कृषिमंत्री सदाभाऊ खोत  यांनी जाखणगाव येथे अर्पण केली जाखणगाव ता खटाव येथील शेतकरी नेते तसेच येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांच्या मातोश्री सौ शशिकला बाबासाहेब भगत यांचा जाखनगाव ता. खटाव जि. सातारा येथे वयाच्या 76 व्या  वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले यांच्या तिसऱ्याच्या विधी वेळी माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत  हे श्रद्धांजली अर्पण करत होते यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, श्रीकांत लावंड, राजेंद्र कचरे ,ज्योतीनाना सावंत,  ऍड .अनिल गोडसे आरपीआयचे गणेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.जाखणगावच्या शिंदे घराण्यातील माहेरवाशींनी असलेल्या व जाखनगावातच वास्तव्य असलेल्या शशिकला भगत यांनी आपला वेगळा ठसा राजकीय क्षेत्रात उंटवला होता तसेच सामाजिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेऊन पुढे जाणाऱ्या महिला म्हणून त्यांची ओळख होती धाडसी आणि धडाडीच्या महिला होत्या बऱ्याच काळापासून  शेतकरी संघटनेत माझ्यासोबत चळवळीत सहभागी असलेल्या संजय भगत  यांच्या त्या मातोश्री असल्या तरी आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आई आज हरपल्या अशी भावपूर्ण प्रतिक्रिया श्री सदाभाऊ खोत साहेब यांनी व्यक्त केली यावेळी  शेतकरी संघटनेचे सूर्यकांत भुजबळ, तानाजीराव देशमुख, शिवाजी शिंदे,  बाळासाहेब गाढवे, बाळासाहेब शिंदे, नाम फाउंडेशन समन्वयक बाळासाहेब शिंदे, जरंडेश्वर उत्पादक कंपनीचे सुरेश फाळके, व पत्रकार संघाच्यावतीने शशिकांत धुमाळ, बाळासाहेब भगत आदि व्यक्तींनी  श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले
यावेळी माजी प.सं .सदस्य दगडूदादा शिंदे, माजी सरपंच गणपतराव शिंदे, चेअरमन संतोष शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, अशोक पाटील, ज्ञानेश्वर शिंदे, रघुनाथ साळुंखे ,राजेंद्र यादव ,समीर फडतरे,  धनाजी जाधव, मानाजी  शिंदे, संजय पाटील, किसनबाबा देशमुख, डॉ. दशरथ जगताप विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी अनेक डिजिटल मीडियाचे पत्रकार आदी ग्रामस्थ पै पाहुणे व परिसरातील व्यक्ती शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
 दरम्यान आमदार महेश शिंदे यांनी सौ शशिकला भगत यांच्या  पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित करून भगत कुटुंबियांचे सांत्वन केले

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.