कोरेगाव पंचायत समितीत,संविधान दिन उत्साहात.

कोरेगाव पंचायत समितीत,
संविधान दिन उत्साहात.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

 कोरेगाव, दिनांक 27: येथील पंचायत समिती कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी श्री .किशोर माने, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे म्हणजेच प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. गटविकास अधिकारी श्री. माने यांनी उद्देशिकेचे महत्त्व सर्वांसमोर विशद केले .यावेळी श्री माने म्हणाले," घटनेची प्रस्तावना म्हणजेच घटनेची गुरुकिल्ली आहे. तिलाच उद्देशिका अथवा घटनेचा सरनामा देखील म्हणतात .या उद्देशिकेमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य भारत घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला आहे .तसेच  समानता,स्वातंत्र्य ,न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे .व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रत्येक नागरिकामध्ये प्रवर्धित करण्याचा संकल्प उद्देशिकेमध्ये करण्यात आला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता, व्यक्ती प्रतिष्ठा, बंधुता या मूल्यांचा जागर उद्देशिकेमध्ये करण्यात आला आहे .26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अमलात आली .भारतीय राज्यघटना हा भारताचा अनमोल ठेवा आहे. राज्यघटनेला अनुसरूनच सर्वोच्च निर्णय घेतले जातात." यावेळी उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले .तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.