पुसेगाव पोलीस स्टेशनला 29 गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यात यश.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
वर्धनगड तालुका खटाव येथे अभय जाकीर काळे, मूळ राहणार मोळ, ता. खटाव जि .सातारा हा वर्धनगड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती सदरची गोपनीय माहिती मिळालेल्या पुसेगाव पोलीस ठाण्याकडील एक तपास पथक तयार करून मौजे वर्धनगड येथे आरोपीचा शोध घेत असताना एका घराच्या आडोशाला दबा धरून बसलेला अभय काळे याला पोलिसांनी सर्व बाजूंनी घेराव टाकला असताना आपल्याकडे पोलीस येत आहेत याची चाहूल लागताच आरोपी अभय काळे हा पळू लागला परंतु त्याचा पाठलाग करून पुसेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी धाडसाने व शिताफिने त्याला पकडण्यात यश आले . त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाणे 18 गुन्हे ,कोरेगाव पोलीस ठाणे1 गुन्हा ,औंध पोलीस ठाणे 2 गुन्हा ,वडूज पोलीस ठाणे 1 गुन्हा ,दहिवडी पोलीस ठाणे 1 गुन्हा , म्हसवड पोलीस ठाणे 1 गुन्हा, उंब्रज पोलीस ठाणे 1 गुन्हा, फलटण शहर पोलीस ठाणे 1 गुन्हा ,सातारा शहर पोलीस ठाणे 2 गुन्हे ,कराड शहर पोलीस ठाणे 1 गुन्हा असे दाखल मालमत्तेच्या गंभीर गुन्ह्यातून बऱ्याच कालावधीपासून फरार असलेला आरोपी अभय जाकीर काळे हा सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला गुंगी देऊन फरार होत होता, परंतु आज पुसेगाव पोलीस ठाण्याचे सिंघम अधिकारी आशिष कांबळे यांच्या नीटनेटक्या नियोजनामुळे आरोपी अभय काळे हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद आहेत. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्हो आहेत.या कारवाई मध्ये सिंघम अधिकारी सपोनी आशिष कांबळे, पोलीस हवालदार योगेश बागल, पोलीस नाईक सुनील अब्दागिरी ,प्रमोद कदम, अशोक सरक, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश घाडगे, गोपनीय विभागाचे अमोल जगदाळे ,महिला पोलीस कविता बरकडे, होमगार्ड सुरेंद्र काटकर यांनी सदरची कारवाई केली आहे. या कारवाई पथकामधील अधिकारी व अंमलदार, पोलीस महिला यांचे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल ,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेळके यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment