सातारा जिल्ह्यातील युवकांसाठी उंच भरारी योजना प्रेरणास्थान.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन ,मनसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ ,रोजगार अशा तरतुदी करण्यासाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 18 ते 30 या वयोगटातील युवक युवती व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे
आज रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून 45 दिवसांचे प्रशिक्षणाकरिता सातारा जिल्ह्यातून हॉटेल मॅनेजमेंट, दुचाकी मेकॅनिकल, चार चाकी मेकॅनिकल, प्लंबिंग , वेल्डिंग , अशीस्टंट इलेक्ट्रिशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरिता एकूण 58 युवकांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनी मार्गदर्शन करून पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सर्व युवकांना पोलीस वाहनातून अहमदनगर येथे प्रशिक्षणाकरिता रवाना केले. आज अखेर उंच भरारी योजनेतून एकूण 547 युवक व युवतींना समुपदेश केले असून सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने दुचाकी रिपेरिंग मेकॅनिकल , चार चाकी रिपेरिंग मेकॅनिकल , हॉटेल मॅनेजमेंट, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग , वेल्डिंग या कोर्सचे प्रशिक्षणाकरिता कोल्हापूर भोर ,अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज अखेर एकूण 538 प्रशिक्षणात पाठवण्यात आले आहे या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांच्या त्यांना स्वतःच्या व्यवसायिक करिता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे उंच भरारी या योजनेचा फायदा सातारा जिल्ह्यातील युवक व युवती यांनी घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी केली आहे.
Comments
Post a Comment