कोरेगावच्या महिलेचा बेळगावात गौरवआदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्काराने उर्मिला सांळुखे सन्मानित.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने राष्ट्रीय आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार हा देशातील दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या पाच राज्यातील निवडक व्यक्तींना देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून सातारा जिल्हयातील कोरेगाव पंचायत समितीच्या एकात्मिका बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती उर्मिला रमेश साळुंखे यांना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदा मंत्री विराप्पा मोईली यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, कोल्हापुर महानगरपालिकेचे महापौर राजु शिंगाडेसाहेब, सुरेश बसाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.श्रीमती उर्मिला साळुंखे यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक, शासकिय व निमशासकिय क्षेत्रात उल्लेखनिय व अतुलनिय निस्वार्थी व भरीवपणे कार्य करून शाश्वत सेवा केल्याबद्द्ल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार मिळाल्याबद्द्ल त्यांचे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले, किन्हईचे सरपंच धनंजय भोसले, सुपरवायझर स्टाफ, अंगणवाडी सेविका, मदतनीस व कोरेगाव पंचक्रोशीतील मान्यवराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment