कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागासाठीपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार महेश शिंदे.
पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार महेश शिंदे.
कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यात मूलभूत
सोईसुविधा उपलब्ध होणार कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात आदर्शवत बनविण्याचे शिवधनुष्य हाती उचललेल्या आमदार महेश शिंदे यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांनी विकासकामे मंजूर केली आहेत. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने मतदारसंघातील मूलभूत सोईसुविधांसह विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. मतदारसंघातील प्रमुख शहरे आणि गावांमध्ये विकासाभिमूख कायापालट झालेला आहे, ग्रामीण भागात देखील रस्ते, गटर्स, सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. दलितवस्ती सुधार योजना, डोंगरी विकास योजनांसह राज्य सरकारच्या अनेकविध योजनांमधून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी देखील कोरेगाव मतदारसंघासाठी सदैव सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागात मूलभूत सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. गिरीष महाजन यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, प्रस्तावास मान्यता दिली असून, पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात ग्रामविकास व पंचायतराज विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी शासन निर्णय काढला असून, निधीची तरतूद देखील केली असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
रस्ता ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटर्सच्या कामांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून, ग्रामीण भाग देखील हायटेक बनविला जाणार आहे. या रस्त्याद्वारे शेतकर्यांचा शेतमाल वाहतुकीचा विषय संपुष्टात येणार असून, शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. निगडी तर्फ सातारा येथे ३० लाख रुपये, रुई येथे ३० लाख रुपये, धोंडेवाडी (तासगाव) येथे २० लाख रुपये, धनगरवाडी (कोडोली) येथे १५ लाख रुपये, फडतरवाडी-माळीनगर येथे १५ लाख रुपये, शिरढोण येथे ३५ लाख रुपये, जाधववाडी-तासगाव (तोरस्करवस्ती) १० लाख रुपये, कोडोली सह्याद्रि हिलसाठी २० लाख रुपये, पाटखळ येथे २५ लाख रुपये, फडतरवाडी-नेर येथे १५ लाख रुपये व ललगुण येथे अंतर्गत बंदिस्त गटर करण्यासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बोरखळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी १५ लाख रुपये, दरुज येथे खंडोबा सभामंडप बांधण्यासाठी २० लाख रुपये, विसापूर-बोबडेवाडी येथे सभामंडप बांधण्यासाठी १५ लाख रुपये, राजापूर येथे मारुती मंदिर दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी १० लाख रुपये, आसगाव येथे मंदिराभोवती पत्र्याचा सभामंडप बनविणे आणि सुशोभिकरण करण्यासाठी १० लाख रुपये, घाडगेवाडी येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी १२ लाख रुपये, निगडी रंगनाथस्वामींची येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी १३ लाख रुपये, सातारारोड-पाडळीस्टेशनमधील मोतीचंदनगर येथे ड्रेनेज लाईनच्या पाईप दुरुस्ती आणि इमारत दुरुस्तीसाठी २० लाख रुपये, तांदुळवाडी येथे गावठाणामध्ये मोरी पुलाचे बांधकाम करण्यासाठी १५ लाख रुपये, अंबवडे संमत वाघोली येथे सभामंडप सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपये, खटावच्या शास्त्रीनगरमध्ये सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये, म्हसवे येथील लमाणवस्तीत श्री सेवालाल मंदिर दुरुस्ती व सुसोभिकरणासाठी ५ लाख रुपये, पांगरखेल येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी १२ लाख रुपये, मोळ येथे रामोशी वस्ती अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे व व्यायामशाळा इमारत बांधकाम करण्यासाठी १५ लाख रुपये, देगावच्या श्रीराम वॉर्डमध्ये सिध्दनाथ सभामंडप बांधण्यासह सुशोभिकरणासाठी १२ लाख ५० हजार रुपये, एकसळ येथे जानाईमळाई मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये, पिंपोडे खुर्द येथे रामोशीवस्तीमध्ये सभामंडप बांधण्यासाठी १० लाख रुपये, संभाजीनगरमध्ये वॉर्ड क्रमांक पाचमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विक्रांतनगर लगत खुल्या जागेवर संरक्षक भींत बांधण्यासाठी १२ लाख रुपये, फडतरवाडी-बुध येथे स्मशानभूमी बांधण्यासाठी १२ लाख रुपये, : महात्मा फुले यांच्या जन्मभूमीचा जीर्णोध्दार आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघात सर्वत्र महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रसार केला आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, मुलगी शिकली तर घर शिकेल, यासाठी ते स्वत: प्रयत्नशील असतात. मतदारसंघात महात्मा जोतिबा फुले यांची जन्मभूमी असलेल्या कटगुण गावाचा समावेश आहे. आमदार महेश शिंदे यांनी जन्मभूमीचा जीर्णोध्दार करण्यासाठी पहिल्यापासून पावले टाकली आहेत. ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाने विकासकामे मंजूर करत असताना कटगुणमधील विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. महात्मा फुले स्मारक सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपये, जानुबाई मंदिर दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी ५ लाख रुपये, शिंदे वस्ती अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविण्यासह बंदिस्त गटर आणि सुशोभिकरणासाठी १५ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये मंजूर केले आहेत. एकूणच कटगुण पसिराचा विकास हाच ध्यास असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
: स्मशानभूमींचे प्रश्न एका झटक्यात मार्गी
मतदारसंघातील अनेक गावे आणि वाडीवस्तीवर स्मशानभूमी अभावी मोठी गैरसोय होत होती, ही बाब प्रकर्षाने समोर आल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी प्रशासकीय पातळीवर अडचणी होत्या, शासकीय अधिकार्यांसमवेत समन्वय ठेवत त्यांनी विषय मार्गी लावले. आता घाडगेवाडी, निगडी रंगनाथस्वामी, पांगरखेल, फडतरवाडी-बुध या गावांमध्ये सुसज्ज स्मशानभूमी उभारली जाणार आहे. यासाठी सुमारे ६१ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment