पुसेगाव सुवर्णनगरीच्या विकासासाठी तीन कोटीचा निधी:-आमदार महेश शिंदे.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटकातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्णनगरी पुसेगावचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. सद्गुरु परमपूज्य सेवागिरी महाराज रथ मार्गाचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण केले जाणार असून बंदिस्त गटारांची कामे देखील आता मार्गी लागले आहे. आमदार महेश शिंदे यांनी तीन कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे. सोमवारी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव यांच्यासह विश्वस्त मंडळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार महेश शिंदे यांनी विकासकामांच्या अनुषंगाने संपूर्ण रथ मार्गाची पाहणी केली.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुसेगावच्या ग्रामस्थांनी विकास कामांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत आमदार महेश शिंदे यांना विक्रमी मताधिक्य दिले होते. पुसेगावचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द देखील आमदार महेश शिंदे यांनी दिला होता. सद्गुरु परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या नगरीचा चौफेर विकास व्हावा, यासाठी त्यांनी विशेष लक्ष देखील दिले होते. देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी रणधीर जाधव यांची एकमताने निवड झाल्यानंतर या नगरीच्या विकासाचे द्वार खऱ्या अर्थाने खुले झाले. रणधीर जाधव यांची निवड होताचक्षणी आमदार महेश शिंदे यांनी परमपूज्य सद्गुरू श्री सेवागिरी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले तसेच देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयास भेट देऊन अभिनंदन केले. यावेळी पुसेगाव - वडूज - कातरखटाव रस्त्यापैकी सुमारे पाऊण किलोमीटर रस्त्यासह रथ मार्गासाठी तीन कोटी रुपयांच्या निधी काँक्रीटीकरण व बंदिस्त गटरांसाठी तीन कोटी रुपये मंजूर करत असल्याचे जाहीर केली होती. खऱ्या अर्थाने रथ मार्ग सुधारण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचे भाविक भक्तांचे ग्रामस्थांनी स्वागत केले होते.सोमवारी सकाळी आमदार महेश शिंदे यांनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव, विश्वस्त संतोष वाघ, सरपंच घनःश्याम मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, विश्वस्त संतोष वाघ, भरत मुळे, प्रताप जाधव, विशाल जाधव, अंकुश पाटील, चंद्रकांत जाधव, हुसेन जाधव, प्रवीण जाधव, रोहन देशमुख, शंकरशेठ जाधव, दिलीप उनउने, सुरज जाधव विघ्नेश जाधव, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत संपूर्ण रथ मार्गाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता गोसावी, राक्षे यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या कामाबरोबरच विद्युत वहिनी स्थलांतर करण्याच्या सूचना महावितरण कंपनीचे शाखा अभियंता आटपाडकर यांना दिल्या. त्याचबरोबर दर्जेदार काम होण्यासाठी सूचना दिल्या. स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत कामाबाबत चर्चा केली. पालखी मार्गाचे काम दर्जेदार होण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत लक्ष द्यावे, कोठेही अडचण निर्माण होणार नाही, अशी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सुवर्णनगरी पुसेगावचा विकास करणार अशा वल्गना यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा केली होती. थेट पुसेगावात विमानतळ उभारून औद्योगिक वसाहत आणण्याचा शब्द देखील दिला होता, प्रत्यक्षात मात्र दहा वर्षात त्यांना पुसेगावात ठोस विकास काम देखील करता आले नाही. त्यांच्या भूलथापांना कंटाळून जनतेने परिवर्तनाची भूमिका घेतल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थ व मतदारांच्या विश्वास सार्थ ठरवत तीन कोटी रुपयांच्या निधी रथ मार्गासाठी उपलब्ध करून दिला आहे. एकूणच सुवर्णनगरी पुसेगावच्या विकास कामांचे प्रवेशद्वार आता खुले झाले असून सुवर्णनगरी पुसेगाव ही विकास कामांनी झळाळून निघणार असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव यांनी सांगितले.
Comments
Post a Comment