आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेल्या खेड नांदगिरीचे उपसरपंच राजेंद्र कुमार कदम, प्रमोद उर्फ संजय कुमार कदम, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार महेश शिंदे, शेजारी संजय कदम, मदन कदम, अमरसिंह कदम, शरद कदम व धनवान कदम.

आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेल्या खेड नांदगिरीचे उपसरपंच राजेंद्र कुमार कदम, प्रमोद उर्फ संजय कुमार कदम, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना  आमदार महेश शिंदे, शेजारी संजय कदम, मदन कदम, अमरसिंह कदम, शरद कदम व धनवान कदम.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

कठापूर, तडवळे संमत कोरेगाव पाठोपाठ आता खेड नांदगिरी गावाचा होणार विकासाभिमुख कायापालट; आमदार महेश शिंदे यांनी मंजूर केला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी, विद्यमान उपसरपंचांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश

संपूर्ण राज्यात कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आदर्शवत बनविण्याचे शिवधनुष्य उचललेल्या आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेड नांदगिरी येथील उपसरपंच राजेंद्र कुमार कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. कठापूर, तडवळे संमत कोरेगाव या गावांपाठोपाठ आता खेड नांदगिरीचा विकासकामांद्वारे कायापालट करण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. यावेळी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी मंजूर करत ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भरीव मदत करण्याचा शब्द देखील दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात खेड नांदगिरी ही पक्षाची राजधानी होती. पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची धुरा या गावाकडे अनेक वर्ष कायम आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतिची सत्ता सोपविली होती. यावेळी देखील आमदार महेश शिंदे गटाचे सरपंच बिनविरोध निवडून आले होते. आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर ठोस आणि दर्जेदार विकासकामे करण्याची मोहीम हाती घेतली असून विकासकामांद्वारे संपूर्ण गावांचा कायापालट केला आहे. आमदार महेश शिंदे हे जनताभिमुख नेतृत्व असून त्यांचे नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपसरपंच राजेंद्र कुमार कदम, माजी सरपंच प्रमोद उर्फ संजय कुमार कदम, ग्रामपंचायतीचे सदस्य, खेड नांदगिरी विकास सेवा सोसायटीचे संचालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी खटाव येथील निवासस्थानी आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. आमदार महेश शिंदे यांनी भगवी शाल देऊन उपसरपंच राजेंद्र कुमार कदम यांच्यासह प्रत्येकाचे स्वागत केले. मतदारसंघातील कठापूर या गावाचा कोट्यवधी रुपयांचा विकास निधी देऊन कायापालट केला आहे. तडवळे संमत कोरेगाव गावाने देखील विकासाच्या मार्गावर जाण्याचा निर्णय ग्रामपंचायत निवडणुकीत घेतला असून या गावाचा कायापालट केला जाणार आहे. आता खेड नांदगिरी ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्याचा शब्द आमदार महेश शिंदे यांनी दिला. त्याची सुरुवात देखील रविवारी सकाळीच केली. यावेळी खेड नांदगिरी गावातील अंतर्गत रस्ते ट्रीमिक्स काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आमदार महेश शिंदे यांनी जागेवरच मंजूर केला. ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून हे काम पूर्ण करण्यासाठी भरीव निधी देण्याचा शब्द त्यांनी दिला. खेड नांदगिरी येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते देखील नजिकच्या काळात केले जातील. विकासकामांद्वारे खेड नांदगिरी परिसराचा कायापालट करणार असल्याचा शब्द देखील आमदार महेश शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी लोकनियुक्त विद्यमान सरपंच सौ.सुनिता सुरेश घनवट खेड नांदगिरी, माजी सरपंच संजय कदम, विकास सोसायटीचे माजी चेअरमन मदन कदम, अमरसिंह कदम, युवा नेते शरद कदम व धनवान कदम उपस्थित होते.
चौकट : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजधानीवर स्वारी; सामान्य जनतेबरोबरच पदाधिकाऱ्यांचे झाले मतपरिवर्तन...!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी खेड नांदगिरीमध्येच अनेक वर्ष आहे. या गावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जिवंत ठेवत पक्षाच्या उमेदवाराला सदैव साथ दिली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खेड नांदगिरीचा अपेक्षित विकास कधीच केला नाही. राज्यातील मोठमोठ्या मंत्र्यांचे कार्यक्रम गावात झाले, मात्र गावासाठी कधीच मोठा निधी मंजूर झाला नव्हता. आमदार महेश शिंदे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देऊन खेड नांदगिरी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे मन दाखविले. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद दिली, त्यांच्या कामाची पद्धती पाहून स्थानिक ग्रामस्थांबरोबरच पदाधिकारी देखील आता खुलेपणाने आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत आहेत. रविवारी झालेल्या जाहीर प्रवेश कार्यक्रमामुळे आता आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजधानीवर स्वारी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार महेश शिंदे हे नजिकच्या काळात संपूर्ण गावाचा विकास कामांद्वारे कायापालट करतील, असा विश्वास सर्वसामान्य कार्यकर्ते व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.