बैलांच्या टकरीसाठी न्यायालयाच्या निकालात स्पष्ट उल्लेख नसल्याने पशुपालकात संभ्रम.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
बैलगाडी शर्यती संदर्भात तामिळनाडू महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांनी वरील संदर्भी केलेल्या सुधारणांवर सुप्रीम कोर्टाने शिक्का मोर्तब केले असल्याने आता जल्लीकट्ट बैलगाड्या शर्यत आणि कंम्बाला या म्हशींच्या शर्यतीचा मार्ग खुला झाला असला तरी न्यायालयाच्या निकालात बैलांच्या टकरी संदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्याने मराठवाड्यातील पशुपालकात मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागात कासार शिरसी परिसरात दिवाळीच्या पाडव्यास व तुळशी विवाह निमित्त बैलांच्या टकरीचे आयोजन करण्यात येत होते ही शंभर वर्षाची परंपरा आहे पण इसवी सन 2011 पासून शासनाने पशुछळवाद कायद्यांतर्गत या प्रथेलात बंदी घातली होती याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने पशुपालकात समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी बैलांच्या टकरी बाबत न्यायालयाचे स्पष्ट संकेत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.जनावरांच्या इतर स्पर्धेपेक्षा बैलांच्या टकरी ह्या माणसांच्या कुस्ती परंपरेतील एक उदात्त भाग आहे जसे की दोन मल्लांचे शरीर परस्परांना भिडते व यातून मनो मिलना सह परस्परात बंधुभाव जागृत होणे ही भावना पशुंच्या टकरीतून सुद्धा त्यांच्यात जोपासली जावी व पशूंचे आरोग्याचे संवर्धन व्हावे ही उदात भावना अभिप्रेत असताना या परंपरेबाबत स्पष्ट निर्देश नसल्याने सर्वत्र असमाधान व्यक्त करण्यात येत आहे वरील संदर्भीय प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment