ब्राह्मण महासंघाची सभा खेळीमेळी व उत्साही वातावरणात पार.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा येथील अखिल ब्राह्मण महासंघाची विशेष सभा खेळीमेळीत व उत्साही वातावरणात पार पडली सुपनेकर हॉलमध्ये झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक राज माजगावकर होते यावेळी एडवोकेट श्रीराम देव भास्कर मेहेंदळे यांची प्रमुख उपस्थिती होती दीप प्रज्वलन व परशुराम प्रतिमा पूजनाने बैठकीस प्रारंभ झाला यानंतर धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या प्रस्ताविकास सभा बोलवण्याचा उद्देश स्पष्ट केला. सभेस उपस्थित असलेल्या अध्यक्ष राज माजगावकर लांडगे संदीप कुलकर्णी श्री वेलणकर श्री विजय जोशी श्री करंबेळकर डॉक्टर श्याम बडवे जगन्नाथ मेंहदळे नितीन जोशी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर श्याम बडवे यांनी व्रत्तबंद संस्काराविषयी माहिती दिली 22 मे रोजी महासंघाकडून सामुदायिक मौजी बंधन होणार असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली यावेळी एडवोकेट श्री रामदेव यांनी आपले मनोगत व्यक्त केले महासंगाकडून दोन वर्षापासून सामुदायिक प्रतिबंध मेळावा घेण्यात येतो तरी दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करावी त्यानंतर अनेक विषयावर साधक बाधक चर्चा झाली. यावेळी रेखा मोघे रेखा बंड नितीन जोशी संजय जोशी वडे उपस्थित होते शेवटी महेश कुलकर्णी यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment