स्व.विश्वनाथ लावंड यांचं सामाजिक कार्य अविस्मरणीय-प्रदीप विधाते.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
खातगुण गावचे सुपुत्र स्वर्गीय वस्ताद विश्वनाथ लावंड(नरेकर) यांनी एस आर पी दलात सेवेत असताना प्रामाणिकपणे काम करून देशसेवेत पोलीस दलाची प्रतिमा उंचावर ठेवण्याचं काम केलं.अशा थोर व्यक्तीच्या स्मरणार्थ सुसज्ज प्रवेशद्वार कमान लावंड(नरेकर)कुटुंबियांनी उभारली असून कमानीला साजेसं काम स्वर्गीय विश्वनाथ लावंड(नरेकर) यांनी केलं आहे. त्यांनी केलेलं सामाजिक कार्य अविस्मरणीय असल्याचं भावोदगार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी काढले.स्वर्गीय वस्ताद विश्वनाथ लावंड यांच्या स्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीमती लिलाबाई लावंड(नरेकर) आणि कुटुंबियांच्या वतीने खटाव पुसेगाव रस्त्यावर खातगुण येथे उभारण्यात आलेल्या प्रवेश कमानीच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात विधाते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक धनाजीराव लावंड,सरपंच अमिनाबी सय्यद,उपसरपंच शिवाजी लावंड,विकास सेवा सोसायटी चेअरमन विजय लावंड,आनंदराव लावंड,मंदाकिनी लावंड, काजल जाधव,मनीषा माने,माजी सरपंच सुषमा लावंड,अर्जुन लावंड आदींची उपस्थिती होती.एस आर पी दल दौंड ता पुणे येथे भरती झाल्यानंतर विविध बक्षिसे मिळवली,कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, त्याचप्रमाणे फायरिंग मध्ये देशात पहिलं बक्षीस मिळवलं,सन 2003 मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी खातगुण येथील शाळेतील मुलांना लेझीम खेळाचं प्रशिक्षण दिलं.तब्बल 18 वर्ष बंद असलेली कुस्ती तालीम पुन्हा सुरू करून गावातील तरुणांना कुस्ती व व्यायामाची सवय लावली, अशा परिस्थितीत गावातील आठ युवक सैन्य दलात भरती झाले.सेवानिवृत्ती नंतर स्वर्गीय विश्वनाथ लावंड यांनी गावातील जनतेसाठी केलेलं काम नक्कीच इतरांना प्रेरणादायी असल्याचं मत जेष्ठ नागरिक वसंत जाधव गुरुजींनी यावेळी व्यक्त केलं.
यावेळी स्वागत कमान शिल्पकार मधुकर लावंड यांचा सत्कार करण्यात आला.यशवंत लावंड यांनी प्रास्ताविक केलं.
Comments
Post a Comment