आजारी असतानाही जनतेच्या प्रश्नासाठी जनता दरबारमध्ये आमदार महेश शिंदे यांनी लावली बाजी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी खटाव पंचायत समितीमध्ये जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात खटाव तालुक्यातील कोरेगाव मतदार संघातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र आ. शिंदे यांना त्रास होऊ लागल्याने कार्यकर्त्याच्या सल्ल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्याकडे जावे लागले . आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत अनेक लोकांचे प्रश्न या दरबारात निकालात निघाले
वडूज येथील पंचायत समिती सभागृहातील या जनता दरबारास प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, तहसीलदार किरण जमदाडे , सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव , भरत मुळे , सरपंच अभय घाटगे ,युवा नेते हरिश्चंद्र सावंत सह विविध शासकीय विभागाचे अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.आ. महेश शिंदे यांची दोन दिवसा पासूनच तब्येत ठिक नव्हती तरी देखील या दरबारास उपस्थित राहणे आपले आद्य कर्तव्य समजून उपस्थिती लावली . सकाळ पासूनच कोरेगाव मतदार संघातील खटाव तालुक्यातील मतदार संघातील गावोगाव चे सरपंच व ग्रामस्थ यांची उपस्थिती लक्षणीय होती . या जनता दरबारला उदंड प्रतिसाद लाभत असतानाच आमदार महेश शिंदे यांना उभे राहणे अशक्य झाल्यामुळे कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे त्यांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला. आ शिंदे हे जनता दरबार सोडून अचानक निघून गेले तरी अनेक विभागाचेअधिकारी यांनी जनतेच्या समस्या ऐकून निवेदन ही स्विकारले .खटाव तालुक्याच्या त्रिभाजनात कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तालुक्यातील भागातील गावांचा समावेश आहे . यामध्ये प्रामुख्याने खटाव , पुसेगाव , बुध, विसापूर, डिस्कळ गावांचा समावेश आहे . या गावांमधून शेकडो लोक तक्रारी घेऊन जनता दरबार मध्ये हजर होती बऱ्याच लोकांनी निवेदने दिली.
Comments
Post a Comment