महिमानगड येथे भरली 29 वर्षानी माझी विदयार्थाची एक दिवशीय शाळा.
पुसेगांव प्रतिनीधी पंकज कदम.
महिमानगड ता माण येथे न्यू इंग्लिश स्कुल या हायस्कूलमध्ये तब्बल 29 वर्षानंतर 1994 च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी वर्गाचे स्नेहसंमेलन झाले .सदर स्नेहसंमेलनाकरिता 29 विद्यार्थी विद्यार्थिनी व उपस्थित होते. तसेच या बॅचचे शिक्षक आसमे सर, मोहिते ,शंकरराव खुस्पे सर उपस्थित राहिले.त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व जणांनी आपले मनोगत व्यक्त केले तब्बल 29 वर्षानंतर भेटून बोलत असताना भावना व्यक्त करताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले व कंठ दाटून आला. शिक्षक वृंदास भेटून सर्वजण भारावून गेले.. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करीत असताना आपल्या स्वतःच्या आयुष्याच्या 45 वर्षाच्या प्रवासातील आजचा सर्वात आनंदाचा दिवस आहे असे मनोगत व्यक्त करताना मत मांडले. त्यानंतर स्नेह भोजनाचा आनंद सामुहिकरीत्या सर्वांनी पंक्तीमध्ये बसून घेतला. महीमानगड हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 56000/-रुपये मदतनिधी या शाळेला दिला . रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वडाचे झाडाचे वृक्षारोपण शाळेच्या आवारात करण्यात आले. यावेळी अधिक धडंबे,चंद्रकांत सूर्यवंशी, मोहन पाटोळे, राजकुमार रोमन, मंजुषा साळुंखे,शरद सावंत मदिना मुलाणी उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले.आभार मंजुषा साळुंखे यांनी मानले.
Comments
Post a Comment