मृत्युंजय शंभुराजे हे अजिंक्य योद्धा होते - शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य शिवपुत्र संभाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या जोरावरती वाढवले टिकवले प्रसंगी बलिदान यातनादायी मरण स्वीकारले पण स्वराज्याची ज्योत अखंडपणे तेवत ठेवली. मृत्यू वरती विजय मिळवणारे मृत्युंजय संभाजी हे अजिंक्य योद्धा होते असे मत शिवव्याख्याते विशाल यांनी व्यक्त केले.छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, डंगिरेवाडी आयोजित संभाजी राजे जयंती उत्सव या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी म्हणाले संभाजीराजे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. सर्व शास्त्रांमध्ये निपुण होते. संभाजी महाराजांच्या तलवारीचा इतिहास समाजापुढे येणे गरजेचे आहे. अवघ्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये तब्बल १२० लढाईचे नेतृत्व स्वतः संभाजी महाराजांनी केले. रणधुरंदर या युद्धाने एकाही लढाईमध्ये पराभव पहिला नाही.बहादूर खानाचा बीमोड करत बहादूरगड स्वराज्यात घेताना विलक्षण युद्ध कौशल्य दाखवले. औरंग्याच्या डोक्यातील मुकुटमणी असणारे ब्रहाणपूर लुटले, कातरखानास कैद केले. अजिंठा,वेरूळ, देवगिरी इत्यादी किल्ले स्वराज्यात घेतले. आपल्या तलवारीला उसंत न देणाऱ्या संभाजी महाराजांनी शेरखानचा पराभव केला भविष्याची दूरदृष्टी असणाऱ्या या योध्याने एलिफंटा बेट अरबांकडून विकत घेतले आणि त्यावरती सागरी गडकोट उभा केला.पोर्तुगीजांची मस्ती उतरवताना पणजीचा किल्ला जिंकला. पोर्तुगीजांबरोबर मुंबईमध्ये टोपीवाले इंग्रजांवरती जरब बसवली. घारापुरी बेट स्वराज्याला जोडून घेतले. दिल्ली बादशाह औरंगजेबाला जेरीस आणणारा सिंहाचा छावा संभाजी तरुणांनी आपल्या काळजात साठवावा असेही शिवव्याख्याते विशाल सूर्यवंशी म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने डंगिरेवाडी येथील युवकांनी शिखर शिंगणापूर येथून शंभू ज्योत घेऊन आले. कार्यक्रमाला गावातील तरुण ज्येष्ठ आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळोखे सर यांनी केले तर श्रीयुत जगदाळे यांनी आभार मानले.
जय शंभुराजे
ReplyDelete