सातारा येथील ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे "चैतन्य भूषण 'पुरस्काराने सन्मानित .

सातारा येथील ज्योतिषाचार्य प्रा डॉ विकास खिलारे "चैतन्य भूषण 'पुरस्काराने सन्मानित .


पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. 

रत्नागिरी येथील चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळातर्फे दिला जाणारा चैतन्य भूषण पुरस्कार सातारा येथील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ,सातारा  याचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती डॉक्टर विकास खिलारे यांना जाहीर झाला असून दिनांक सात मे रोजी एक दिवशीय ज्योतिष संमेलनात साई मंगल कार्यालय रत्नागिरी येथे नुकताच प्रदान करण्यात आला .पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मान चिन्ह, पंचवीसे एक रुपया, राजमुद्रा, शाल, श्रीफळ असे होते हा पुरस्कार हा पुरस्कार चैतन्य ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न मुळे व ज्योतिष रत्न नंदकिशोर जकातदार यांच्या हस्ते तसेच एडवोकेट मालती शर्मा, कुलगुरू श्री विजय शास्त्री संग मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
 डॉक्टर विकास खिलारे यांनी 2012 मध्ये वैद्यकीय व्यवसाय सोडून ज्योतिष शास्त्र या विषयात संशोधन केले असून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे ते गेली १४ वर्ष विवाह विषयक मार्गर्दर्शक  व समुपदेशक म्हणून सातारा येथे कार्यारत आहेत त्यांच्या या पुरस्काराबद्दल  विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांचं अभिनंदन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.