कोरेगावच्या सुभाषनगर परिसरात गुरुवारी दि. ४ मे रोजी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण.

कोरेगावच्या सुभाषनगर परिसरात गुरुवारी दि. ४  मे रोजी आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण.

कोरेगाव प्रतिनिधी.. अज्जू मुल्ला. 


कोरेगाव शहरातील सुभाषनगर उपनगरामध्ये सुमारे दहा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण गुरुवार दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कोरेगाव विकास आघाडी व नगरपंचायतीतर्फे देण्यात आली.
खंडाळा जयसिंगपूर राज्य मार्गाचे (कोरेगाव ते रहिमतपूर रस्ता) कोरेगाव जुना मोटार स्टँड ते डी. पी. भोसले कॉलेज दरम्यान सुशोभिकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला असून त्या कामाचा शुभारंभ यावेळी केला जाणार आहे.  त्याचबरोबर सुभाषनगर प्रभागांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात येणार आहे.आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे व मुख्याधिकारी चेतन कोंडे देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेतआमदार महेश शिंदे यांनी सुभाषनगरसह राजर्षी शाहू नगर, डी. पी. भोसले कॉलेज परिसर, साई कॉलनी, भंडारी कॉलनी परिसर विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे विविध योजनांमधून विकास कामांसाठी लाखो रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा कोरेगाव रहिमतपूर रस्ता आता चांगल्या पद्धतीने मजबूत व हॉटमिक्स ट्रिपल कोटेड डांबरीकरण झालेला आहे. आता या रस्त्याचे सुशोभिकरण केले जात असून शहरातील एक आदर्शवत परिसर म्हणून सुभाषनगर ओळखले जाणार आहे.
या कार्यक्रमास कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अभिनव आणि समावेशक ...सर्व धर्म समभाव मोहीम कोरेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रितपणे राहत आहेत. सर्व समाज घटक हे कोरेगावशी एकरूप झाले आहेत, या समाजांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांच्या हितासाठी आमदार महेश शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुभाषनगर येथील नाना- नानी पार्क या ठिकाणी शहरातील ब्राह्मण, लिंगायत वाणी, नाभिक, देवांग कोष्टी, परीट, कुंभार, सुतार, सनगर-धनगर, माळी तेली समाज आदी विविध जाती धर्म समुदायांसाठी सामाजिक सभागृह, समाज मंदीर आणि सांस्कृतिक भवन यासाठी जागा नगरपंचायतीतर्फे उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचे वितरण केले जाणार आहे. यासाठी अगोदरच प्रत्येकी २५ लाख रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे. आमदार महेश शिंदे यांनी सर्व धर्म समभाव ही भूमिका कायम ठेवत कोरेगावच्या उत्कर्षासाठी हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.