येस ग्रुप सोयाबीनला देणार 6500 रुपये तर घेवड्याला 8500 रुपये दर - येस ग्रुप संस्थापक संजय भगत यांची माहिती.

येस ग्रुप सोयाबीनला देणार 6500 रुपये तर घेवड्याला 8500  रुपये दर -  येस ग्रुप संस्थापक संजय भगत यांची माहिती.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुपने जून 2023 या वर्षासाठी या खरीप हंगामातील सोयाबीनला 6100 ते 6500 तर घेवड्याला 7100ते 8500 रुपये प्रतिक्विंटल करार शेतीचे दर फिक्स केले असल्याची माहिती येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी दिली
कोपर्डे ता. खंडाळा येथे झालेल्या करार शेती कार्यक्रमात येस ग्रुपचे संस्थापक श्री संजय भगत  मार्गदर्शन करत होते यावेळी सरपंच दीपक शिंदे, रामभाऊ शिंदे ,रमेश शिंदे ,शहाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती घेवडा सोयाबीन किंवा कोणताही शेतीमाल हा चांगल्या प्रकारे पिकवण्याची शेतकऱ्यांना आयडिया आली आहे मात्र दराची खात्री नसल्यामुळे शेतकरी कायम  कमी दराच्या दुष्टचक्रात  गुंतलेला आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी येस ग्रुपने करार शेतीचा प्रयोग चालू केला असून शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट देणे व शेतकऱ्यांना चांगले बियाणे पुरवठा करून त्यांना मोफत मार्गदर्शन करून 20 टक्के उत्पादन खर्च कमी करणे व 20 टक्के उत्पादन वाढवणे अशा एक कलमी कार्यक्रमाखाली सोयाबीन , घेवडा करार शेतीचे येस ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत असले तरी आम्ही जमिनीवरचे पाय हालु दिलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणे हाच प्रमुख उद्देश  येस ग्रुपचा असल्याचेही श्री भगत यांनी स्पष्ट केले. यावेळी दत्तात्रय शिंदे, प्रदीप शिंदे ,शहाजी शिंदे ,अर्जुन गोळे , राहुल शिंदे ,ओंकार शिंदे, बाळासो महानवर, उमेश कोळपे, विलास शिंदे आणि प्रगतशील बागायतदार शेतकरी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.