मायणी बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी; ग्रामपंचायतीने लक्ष देणे गरजेचे.
पुसेगांव प्रतिनिधी - पंकज कदम.
मायणी ता खटाव येथील बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी दर अर्ध्या तासाला होत असून या पेठेतून जड वाहने जात असल्याने वाहनधारक पूर्णपणे वैतागले आहेत याबाबत अधिक माहिती अशी मल्हारपेठ पंढरपूर रस्ता हा मायणी बाजारपेठेतून जातो रस्ता रुंदीकरण 2022 मध्ये अकरा मीटरने झाले असले तरी वाहतुकीची कोंडी मात्र कायम आहे याचे प्रमुख कारण म्हणजे वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात तसेच छोटे दुकानदार देखील आपली वाहने दिवसभर रस्त्याच्या कडेला उभी करतातच याच मार्गावर एसटी बस स्थानक बँका पतसंस्था असल्याने अनेक दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख यांनी डिसेंबर 2022 मध्ये सम विषम पार्किंग झोन तयार करून पाठवला होता परंतु तो लागू झाला नाही तरी ग्रामपंचायतीने सम विषम पार्किंग झोन तयार करून वाहनधारकांना या वाहतुकीच्या कोंडीतून दिलासा द्यावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.
Comments
Post a Comment