विसापूर येथे तळुपाळी देवीच्या मंदिराचा कलशारोहण समारंभ बुधवारी आयोजन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
विसापूर तालुका खटाव येथील जाधववस्ती येथील तळुपाळी देवीच्या कलशारोहनचा समारंभ बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी दुपारी 1 वा.ता आयोजित केला असून या कार्यक्रमाचे प.पू .कालिदास उर्फ आझादगिरी महाराज (दाजीपूर )आजीवन मठाधिपती त्रंबकेश्वर यांच्या हस्ते होणार असून विसापूर व परिसरातील लोकांनी याचा लाभ घ्यावा व या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी 9 वा.ता गणपती पूजन, 1O वा.ता स्वस्तिक पुण्यहवनवाचन , 11 वा.ता अग्निस्थापना, देवतास्थापना, होमहवन, पूर्णाहुती, दुपारी 1 वा .ता कलाशारोहन व त्यानंतर महाआरती, दुपारी 3 नंतर महाप्रसाद आयोजित केला आहे या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संयोजकांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment