भारत देशामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचा टॉप 10 मध्ये समाविष्ट व महाराष्ट्र राज्यात नंबर 1.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील पोलीस स्टेशनचा केंद्राच्या पाहणीनुसार सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून राज्यात प्रथम तर भारत देशात दहा पोलीस स्टेशन मध्ये क्रमांक आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या व पुसेगाव नगरीच्या नावात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
केंद्राच्या पाहणीनुसार पोलीस महासंचालक पोलीस, महानिरीक्षक परिषद 2022 मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान पुसेगावला देण्यात आला.
पोलीस ठाण्याचा क्राईम डेट गुन्ह्यांची तपासणी ऑनलाईन कामाची पद्धत वेळेत कामकाज पूर्ण करणे लोक भिमुख कार्य चारित्र्याचे दाखले अशाअनेक अटी व शर्ती पास करत हा बहुमान मिळवला. यासाठी स्पर्धा सुरू होणार त्यापासून ची सर्व अधिकारी कर्मचारी पुसेगाव,खटाव,सह खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सर्व जनता लोकप्रतिनिधी,विविध मंडळांचे अध्यक्ष, विविध दैनिकांचे पत्रकार, इलेक्ट्रिकल डिजिटल मीडिया, पदाधिकारी ,कार्यकर्ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा हा गौरव असल्याची पोचपावती म्हणून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापुसाहेब बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे मॅडम, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सपोनि संभाजी गायकवाड , सपोनि चेतन मछले, सपोनि संजय बोंबले, सपोनि राजेंद्र सावंत्रे व पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील यांच्याबरोबर विविध गावचे पोलीस पाटील ,पोलीस होमगार्ड, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातून विविध स्तरावरून पुसेगाव पोलीस स्टेशनचे अभिनंदन करण्यात येत आहे
Comments
Post a Comment