गणेशउत्सव निमित्त नारायणी बाग सोसायटी मध्ये रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद.

गणेशउत्सव निमित्त नारायणी बाग सोसायटी मध्ये रक्तदान शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. 

 गणेशउत्सव निमित्त नारायणीबाग येथे रक्तदान  शिबिरला सोसायटीमधील प्रत्येक घरातील व्यक्तींनी येऊन रक्तदान केले आणि सर्वांना रक्तदानाबद्दलचा एक मौलिक संदेश दिला त्यामुळे कोणाचा तरी जीव वाचत असतो ही भावना मोठी  आहे  समाधान देणारे आहे .
नारायण बाग गणेश मंडळ आणि हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर चे आयोजन केले होते.कोणताही रुग्ण रक्त मिळाले नाही म्हणून दगावू नये हे आपले ध्येय असे हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष आप्पासाहेब घोरपडे यांनी बोलले.गणेश उत्सव मध्ये दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते.
आतापर्यंत 35 वेळा रक्तदान करणारे सोमन काका हे रक्तदान शिबिर चे प्रेरणादायी व्यक्ती ठरले. स्वामी समर्थ महाराजांची भूमिका केलेले प्रसिद्ध अभिनेते समीर  सर तसेच धनंजय भोसले वसुंधरा फाउंडेशन यांनी स्वतः हजर राहून मंडळाला खूप खूप शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिर साठी मंडळाचे  पदाधिकारी
: राज लोखंडे, भाग्येश लोखंडे, पार्थ खाडिलकर, साईराम मोरे, आर्यन कोंडे, प्रज्वल नलावडे, अथांग अष्टेकर, शर्वरी अष्टेकर , रचना गोब्बी,  नुपूर देशमुख, शब्दाली डावरे, श्लोक पायगुडे,: रमेश लोखंडे, सोमण काका हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष आणि रक्तदान क्षेत्रामधील राष्ट्रीय पुरस्कार विजेते आप्पासाहेब घोरपडे यांनी नारायणबाग मित्र मंडळ तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.