आदर्श शिक्षिका संगिता शिंदे यांचा अपघातात मृत्यू.

आदर्श शिक्षिका संगिता शिंदे यांचा अपघातात मृत्यू.



पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

विसापूर ता.खटाव येथे दुचाकीच्या अपघातात आदर्श शिक्षिका संगिता अंकुश शिंदे (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. खटाव तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष श्री अंकुश गणपत शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता अंकुश शिंदे आज  गुरुवार दि.२१ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास पुसेगाववरून मूळ गाव असणाऱ्या गादेवाडीकडे जात होत्या. दरम्यान औंध - फलटण राज्य महामार्गावरील विसापूर हद्दीत ( ठाकरमाळ) येथे दुचाकीचा अपघात झाला.त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. संगिता अंकुश शिंदे  या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधावलेवाडी (विसापूर) येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. सातारा जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० चा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला होता.  त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.