धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
फलटण प्रतिनिधी, बबनराव मदने.
धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजी राजे महाविद्यालयाच्या उद्यानकन्या यांनी धुळदेव येथे १९ सप्टेंबर वार मंगळवार रोजी सकाळी ९:३० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न केली. या तपासणीची कल्पना गावातील नागरिकांना अगोदर दिली गेली होती.गावांमध्ये दोन दिवस अगोदर आरोग्य तपासणीच्या पत्रिकेमार्फत गावकऱ्यांना आमंत्रण दिले गेले होते.ही तपासणी ज्ञानदीप शिक्षण संस्था , धुळदेव येथे संपन्न झाली .या तपासणी दरम्याने गावातील नागरिकांची BP, pulse rate,eye checkup ची तपासणी केली. या शिबिरसाठी Dr. महाजन एस. पी. सरांना तपासणीसाठी आमंत्रित केले गेले होते. या कार्यक्रमाला वृध्द तसेच तरुण मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली होती .तब्बल ४० नागरिकांची आरोग्य तपासणी संपन्न झाली. ही सर्व तपासणी उद्यानकन्यांच्या देखरेखीखाली संपन्न झाली.
Comments
Post a Comment