पुसेगाव मध्ये प्रथमच कॉम्पुटर असिस्टेड ब्रिज प्लेटिंग।

पुसेगाव मध्ये प्रथमच कॉम्पुटर असिस्टेड ब्रिज प्लेटिंग।


 विशेष  प्रतिनिधी, अकबर भालदार. 

संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर पुसेगाव तालुका खटाव  येथे नवनवीन शस्त्रक्रिया करून पंचक्रोशीतील नव्हे तर दूर दूरच्या रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे कार्य घडत आहे.
 पुसेगाव येथील संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर येथे ग्रामीण भागामध्ये डॉक्टर अंबादास कदम यांनीआपल्या जिद्दीवर व मेहनतीने संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर इथे विविध उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिलेली आहे.तसाच एक दुर्दैवी  रुग्ण अपघातात मांडीचे हाड मोडून ऍडमिट झाला.
त्या रुग्णाचा हा चौथा अपघात होता व पाच वेळा त्याची सातारा, सोलापूर जिल्ह्यात शस्त्रक्रिया झाली होती.
त्याच मांडीच्या वरच्या भागात "टी एच आर" म्हणजे खुबा सांधेबदली झालेले  आणि त्याच मांडीच्या खाली गुडघ्यापासून नाडगी पर्यंत प्लेट बसविलेली अत्यंत क्लिस्ट परिस्थिती आणि रुग्ण पण वैतागलेला....... त्यामुळे कोणत्याच साधारण शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध न्हवता, रक्त गट पण दुर्मिळ.. पण पेशंट,नातेवाईक यांना विश्वासात घेऊन डॉ. अंबादास कदम व डॉ आनंद आष्टुरे यांनी साधन सामुग्रीची जोडणी करून पुसेगाव या ग्रामीण भागात ऍडव्हान्स सर्जरीचा निर्णय घेतला. पाच तासाच्या अथक परिश्रमांती एक समाधानकारक उपचार करून रुग्णाला 2 दिवसात घरी पाठविले....या शास्त्रक्रियेस भूल तज्ञ डॉ पृथ्वी दोशी यांचे सहकार्य लाभले. या शस्त्रक्रियेत गुढघ्याच्या जवळ एक छोटी काप घेऊन" आय आय टी व्ही " मशीन द्वारे प्रत्यारोपण करण्यात आले.
 डॉक्टर अंबादास कदम, व डॉक्टर आनंद अष्ठुरे यांचे या ठिकाणी विविध प्रकारच्या पेशंटवर विविध शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे व अल्पदरामध्ये खटाव तालुक्यातील पुसेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये होत आहे. हे रुग्णांसाठी खरोखरच हॉस्पिटलच्या  नावाप्रमाणे नव संजीवनी देण्याचे कार्य करीत आहे  हे पुसेगावकरांसाठी पर्वणीय आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.