पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशामुळे डीबी पथकाने सहा गुन्हे सलग सहा दिवसात उघडकीस आणून मारला षटकार.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशामुळे डीबी पथकाने सहा गुन्हे सलग सहा दिवसात उघडकीस आणून मारला षटकार.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
कराड गुन्हे प्रकटीकरण पथकाने सलग सहा दिवस पुढील एकूण सहा गुन्हे उघडकीस करत गुन्हे उघडकीस आणण्याचा षटकार मारला आहे कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एक आरोपी अटक करत मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे ,दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये एक आरोपीस अटक करून शंभर टक्के रिकवरी सह घरपोडी उघड करण्यात आली आहे,
तिसऱ्या गुन्हामधील दोन आरोपींना अटक करत पिस्टलसह मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे,
तर चौथ्या गुन्ह्यामधील दोन आरोपीस अटक करत एक किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे ,तर पाचव्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक करत शंभर टक्के रिकवरी करण्यात आलेली आहे, सहाव्या गुन्हा मधील दोन आरोपी अटक करत 100% रिकवरी आली आहे. सदर कारवाईत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.सदर या कामगिरीसाठी सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कराड विभागीय कराड अमोल ठाकूर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डांगे, सहाय्यक फौजदार रघुनाथ देसाई ,संजय देवकुळे ,शशी काळे ,संतोष पाडळे ,कुलदीप कोळी ,महेश शिंदे ,आनंदा जाधव ,अमोल देशमुख ,मुकेश मोरे ,दिग्विजय सोंडगे, सोनाली पिसाळ यांनी कारवाई मध्ये भाग घेतला या सर्वांचे सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment