आजोबांच्या वर्षश्राद्ध निमित्त नातवाचे रक्तदान शिबिर. कैलासवासी दिलीप नगर नाईक जैन यांच्या वर्षश्राद्ध निमित्त श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान व हर्ष फाउंडेशन चा कौतुकास्पद उपक्रम.
कैलासवासी दिलीप नगर नाईक जैन यांच्या वर्षश्राद्ध निमित्त श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान व हर्ष फाउंडेशन चा कौतुकास्पद उपक्रम.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
आपल्या आजोबांनी आपल्या आयुष्यामध्ये एक चांगले काम करून ठेवले होते आणि त्याची पुण्याई म्हणून आज त्यांच्या नातवाने त्यांच्या वर्ष श्राद्ध निमित्त भव्य रक्तदान शिबिर च्या आयोजन रहाटणी ला करून समाजापुढे एक नवीन संकल्पना योजना आणली कैलासवासी दिलीप जैन यांचे खायाचा निमित्त गेल्या वर्षी निधन झाले होते आज त्यांच्यावर श्राद्ध निमित्त त्यांचा मुलगा तन्मय नगर नाईक दिपाली, दक्षता यांनी भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन केले होते. रक्तदान शिबिर ला ४० रक्तदाते रक्तदान केले.
यामध्ये त्यांची नातवंडे रूही आणि आयुष यांचा मोलाचा वाटा होता.कोणताही रुग्ण रक्त मिळाल नाही म्हणून दगाऊ नये आणि संकल्प नवा ध्यास हवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा ही संकल्पना हर्ष फाउंडेशनची आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे .जास्तीत जास्त रुग्णांना मोफत रक्ताची संकल्पना यामुळे आज नगर नाईक जैन कुटुंबियांनी मोलाचा भूमिका केली .आज पर्यंत हर्ष फाउंडेशनने वाढदिवसानिमित्त लग्नात तसेच वर्ष श्राद्ध निमित्त रक्तदान शिबिर राबवून समाजात आपण गरजू रुग्णांसाठी तरी रक्तदान सारखे पुण्य काम करावे आणि त्या व्यक्तीचा जीव वाचवा यासाठी सर्व सहकारी बंधू रुग्ण सेवा करत आहेत.रक्तदान शिबिर ला सामाजिक क्षेत्रामधील मान्यवरांची हजेरी लाभली , चंद्रकांत रासकर आणि कांबळे साहेब यांनी हजेरी लावून त्यांनी या रक्तदान शिबिर बद्दल नगर नाईक कुटुंब यांचे खूप खूप अभिनंदन सुद्धा केले .समाजामध्ये आपण कोणासाठी तरी देणे लागतो हे प्रेरणा पूर्ण समाजाला मिळावी.
Comments
Post a Comment