पुसेगाव येथे पुसेगाव पोलीस स्टेशनचा रूट मार्च.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या हिंदू व मुस्लिम पवित्र सणाच्या निमित्ताने व तसेच नुकत्याच पुसेसावळी येथील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पुसेगाव येथे दिनांक 14.09.2023 रोजी सायंकाळी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम आणि रुटमार्च पुसेगाव परिसरात घेण्यात आला व येणाऱ्या सण उत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तयार असलेचा संदेश त्या माध्यमातून देण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव श्री राजेंद्र शेळके, सहा पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे श्री आशिष कांबळे, कोरेगाव उपविभागातील व मुख्यालयाकडील असे एकूण 07 अधिकारी, 42 पोलीस अंमलदार, 20 होमगार्ड, 6 पोलीस वाहने, ॲम्ब्युलन्स, अंग्नीशामक वाहन असा फौजफाटा उपलब्ध होता.
Comments
Post a Comment