धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यावतीने रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी यांच्यासाठी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन.

धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यावतीने रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी यांच्यासाठी खेळांच्या स्पर्धेचे आयोजन.

 फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे  श्रीमंत शिवाजी राजे महाविद्यालयाच्या उद्यान कन्या यांनी रयत शिक्षण संस्थेचे श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथे इयत्ता पाचवी व इयत्ता सहावी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या .या स्पर्धेदरम्याने विद्यार्थ्यांना विविध खेळाच्या संधी देण्यात आल्या. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थाचे श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव चे प्राचार्य मा. वसंतराव मोरे व मा. खेळाचे सर यांनी उपस्थिती दर्शवली ,तसेच उद्यान कन्यांचे स्पर्धा घेतल्याने त्यांनी आभारी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी ही या स्पर्धेमध्ये आपला उत्साह सहभाग दर्शवला. या स्पर्धेमध्ये बॅडमिंटन, खो-खो ,धावणे या स्पर्धांचे आयोजन केले होते. खेळाच्या शेवटी उद्याकन्यांनी विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस मा. प्राचार्यांच्या हस्ते तसेच खेळाच्या सरांमार्फत दिले.या खेळामध्ये तब्बल  45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.