गणराया अवॉर्ड 2023 मध्ये भाग घेण्याचे गणेश मंडळांना आवाहन :-एपीआय आशिष कांबळे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या गावागावातील विविध गणेश मंडळांनी गणराया अॅवॉर्ड 2023 - 24 साठी विविध उपक्रम राबवून या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे यांनी केले आहे.या अॅवॉर्डमध्ये सामाजिक उपक्रम बाबत माहिती यामध्ये 1 ) वृक्षारोपण श्रमदान, शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप ,तसेच विविध शालेय परीक्षेत विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जनसेवा वर्गणीचा एक हिस्सा समाजासाठी ,मतदार जनजागृती मोहीम ,गरीब मुले दत्तक योजना ,शेतीविषयक कार्यशाळा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. 2) आरोग्यविषयक उपक्रम राबवणे ,अवयवदान जागृती शिबिर ,नेत्र शिबिर ,आरोग्य शिबिर. 3 ) पारंपारिक पद्धतीने मिरवणूक व उत्सव साजरा करण्यासाठी केलेले प्रयत्न ,सजावटीचे साहित्य पर्यावरण पूरक असणे, शिस्तबद्ध ,आकर्षक ,टाळ, मृदुंगात, पालखीतून मिरवणूक.4) मंडळाचे पुढे तांत्रिक / जिवंत देखावा सादर करणे ,समाज उपयोगी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय जागतिक पातळीवरील संदेश पोहोचवणे. 5) दहा दिवसाच्या कालावधीत आवश्यक परवाने घेतले आहेत काय ,(धर्मादाय आयुक्त ,पोलीस ठाणे , ग्रामपंचायत ,महावितरण आधी परवाने . 6) वर्गणीची कोणासही सक्ती नसावी मंडळाचे खर्चाचा लेखाजोखा अद्यायावत ठेवावा.7) शासनाकडून वेळोवेळी निर्गर्मित होणारे आदेशाची अंमलबजावणी झालेले आहे का 24 तास स्वयंसेवक उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे, असे नियम असून सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गावच्या पोलीस पाटील यांच्याकडे नोंदणी करावी
तर गणराया अॅवॉर्ड निवड समिती मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पुसेगाव ,केशव जाधव पत्रकार ,सुनील रणसिंग, प्रल्हाद सावंत हे गणराया अॅवॉर्ड निवड समितीचे सदस्य असणार आहेत अशी माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आशिष कांबळे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment