मानाच्या दुर्गादेवीच्या सभा मंडपा चे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
हजारों भविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील मानाच्या देवीच्या सभा मंडपाची बांधण्याची मागणी ग्रामस्थानी आ. महेश शिंदे यांचे कड़े केली होती. मागील वर्षी आ. महेश शिंदे यांनी निधि जाहिर केला होता. संपूर्ण पुसेगाव मधून या सभामंडपासाठी लाखो रूपये लोकवर्गणी जमा होत असून आ. महेश शिंदे यांनी सभा मंडपासाठी 10 लाख रुपए निधि दिला आहे यानंतर दुर्गादेवी च्या सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे, श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज , राष्ट्रीय कांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडला.
यावेळी दुर्गादेवीच्या सभामंडपाला व पुसेगाव सेवागिरी महाराज तीर्थक्षेत्राला निधि कमी पडू देणार नाही असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले. पुसेगाव हे आणखी एक अध्यात्मिक केंद्र तयार होत असून ही आनंदाची बाब आहे . असे आमदार महेश शिंदे म्हणाले तर पुसेगाव मधील तरुण वर्ग योग्य दिशेने चालला आहे असे मत जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष धीरज जाधव, उपसरपंच पृथ्वीराज जाधव , भरत मुळे, प्रताप जाधव , प्रकाश जाधव योगेश देशमुख , संदीप सत्रे , प्रा. टी एन जाधव, प्रा. ए.डी. जाधव , संजय जाधव , अविनाश क्षिरसागर, अशोक जाधव , संदीप जाधव , सूरज जाधव , आणि पदाधिकारी विविध मंडळाचे अध्यक्ष सदस्य प्रतिष्ठित नागरिक पुसेगाव पंचक्रोशीतील महिला , ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment