दरोड्यासह व अपहरण करणाऱ्या आरोपींना सातारा पोलिसांनी 24 तासात पकडले.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल ते विसावा नका सातारा कडे जाणाऱ्या रोडवर आठ इसमांनी फिर्यादी यास तू आमच्याकडे खुन्नस काढतो का तू आमच्या साथीदाराला मारतोस काय असे म्हणून त्यातील एकाने दिनांक 1.9.2023 रोजी रात्री नऊच्या सुमारास हॉटेल नेशन या ठिकाणी फिर्यादी यांच्या डोक्यात घातक हत्याराने वार केला तसेच इतरांनी पट्ट्याने व लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्याच्या मित्रास मारहाण करून फिर्यादी यास मोटरसायकल वरून कुरनेश्वर जकातवाडी तालुका सातारा येथे पळवून नेऊन त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते सदर बाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,यांनी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांना व पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मदतीने आरोपी निष्पन्न करून पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून शोध मोहीम सुरू केली होती दिनांक 2 .9 .2023 रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व विशेष तपास पथकाचे नमूद गुन्ह्यातील आरोपी यांची गोपनीय बातमीदार मार्फत माहिती काढून सातारा शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून गुन्हयातील चार आरोपी व एक विधीसंघर्ष ग्रस्त बालकासह सातारा शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली आहे या कारवाई मध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील ,रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील ,विश्वास शिंगाडे, अमित पाटील ,पोलीस अंमलदार सतीश घाडगे, संतोष सपकाळ ,संजय शिर्के, विजय कांबळे , लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने ,प्रवीण फडतरे ,अमित झेंडे ,अजय जाधव ,अविनाश चव्हाण, गणेश कापसे ,मोहन पवार, विक्रम पिसाळ ,ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, अमित माने ,अरुण पाटील ,विशाल पवार ,रोहित निकम ,पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने .यांनी सदर कारवाई केली आहे कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment