श्री सेवागिरी व्याख्यानमाला दिनांक दहा रोजी सुरू होणार.

श्री सेवागिरी व्याख्यानमाला दिनांक दहा रोजी सुरू होणार. 

 विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. 

तीर्थक्षेत्र पुसेगाव तालुका खटाव येथे श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव, व न्यू सातारा नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही परमपूज्य श्री हनुमानगिरी महाराज यांच्या 43 व्या पुण्यतिथी निमित्ताने श्री सेवागिरी व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. पुसेगाव व पंचक्रोशीतील रसिक प्रेमीं, साहित्य प्रेमीना अपूर्व पर्वणी असून,या वाङमयाचे संयोजन रविवार दि. 10 9 2023 ते शनिवार दिनांक  16 9 2023 या सप्ताहात करण्यात आले आहे. तरी रसिक श्रोत्यांनी  याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, या व्याख्यानमालेचे उद्घाटन खासदार श्री श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.या श्री सेवागिरी व्याख्यानमालेची सुरुवात दि.10 रोजी खासदार मा.श्रीनिवास पाटील मा.राज्यपाल व लोकसभा सदस्य,"प्रशासन समाजकारण, आणि राजकारण" या विषयावर व्याख्यान देणार असून,दि. 11 रोजी श्री उदय देवळाणकर, छत्रपती संभाजीनगर,मुख्य सल्लागार कापूस सोयाबीन,तेलबिया महाराष्ट्र राज्य, विषय "जागतिकीकरणात भारतीय शेतीचे भविष्य "या विषयावर व्याख्यान करणार आहेत. दिनांक 12 रोजी श्री गणेश शिंदे पुणे,कार्यकारी परिषद सदस्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी," जीवन सुंदर आहे "या विषयावर व्याख्यान करणार आहेत. दि. 13 रोजी प्रा अभय भंडारी विटा,नामवंत विचारवंत,"आपली संस्कृती व आजचा विचार" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दि. 14 रोजी सौ सायली गोडबोले -जोशी पुणे, इतिहास संशोधक एकपात्री कलाकार, "भारतीय महिलाचा समृद्ध वारसा" दिनांक 15 रोजी श्री समीर शेख आयपीएस पोलीस अधीक्षक सातारा, "स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना" या विषयावर व्याख्यान देणार आहेत. दि. 16 रोजी ह भ प श्री अविनाश भारती पुणे "संत चरित्र "या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. रविवार दिनांक 17 रोजी परमपूज्य हनुमानगिरी महाराज यांच्या 43 व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी 11 वाजता समाधीस महाअभिषेक, मंत्रपुष्पांजली, आरती व नंतर महाप्रसाद आयोजन श्री सेवागिरी मंदिरामध्ये करण्यात आले आहे. हे सर्व व्याख्यान कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता घेण्यात येणार आहेत. परमपूज्य श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव परमपूज्य 108  श्री महंत सुंदरगिरीजी महाराज,चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब मुगुटराव जाधव, विश्वस्त मा.गौरव रायसिंग जाधव, मा. संतोष गुलाबराव वाघ, मा. सचिन हिंदुराव देशमुख, मा.डॉक्टर सुरेश सर्जेराव जाधव, मा.रणधीर सुभाषराव जाधव व ग्रामस्थ पुसेगाव यांचे संयोजन व मार्गदर्शनाखाली होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.