धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाविद्यालयाच्या उद्यानकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमाबाबत शेतकऱ्यांची सुसंवाद प्रस्थापित.

धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाविद्यालयाच्या उद्यानकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमाबाबत शेतकऱ्यांची सुसंवाद प्रस्थापित.

 फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाविद्यालयाच्या उद्यानकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रमाबाबत शेतकऱ्यांची सुसंवाद प्रस्थापित करून कृषी विषयामधलाच एक भाग म्हणजे पशुवैद्यकीय चाचणी शिबिर धुळदेव येथे उद्यानकन्या यांनी संपन्न केली. या कार्यक्रमांमध्ये  पाशूचिकित्सक सचिन पोळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पशुवैद्यकीय चाचणीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देऊन त्यांच्यामध्ये पशु आरोग्य बद्दल जनजागृती प्रस्थापित केली , जसे की पशु आजार, पशुखाद्य ,तसेच गोठ्याची व जनावरांची नियमित स्वच्छता याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले . या उद्यानकन्यांमध्ये  दातार रिषिता, देवकाते मृणाल ,देवकर कोमल, कापसे गौरी , कर्चे योगिता , पवार प्राची यांचा समावेश होता . या उद्यानकन्यांनी दोन दिवस अगोदर पासून गावांमध्ये पशुवैद्यकीय चाचणी पत्रिकांच्या मार्फत सर्व शेतकरी ग्रामस्थांना आमंत्रित केले. शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास  उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली .चाचणी दरम्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक असे उत्तर पशुचिकित्सक सचिन पोळ यांनी दिली. उद्यानकन्यांनी शेतकऱ्यांचे तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून शिबिराच्या कार्यक्रमाचा निरोप समारंभ केला. या चाचणीदरम्याने शेतकऱ्यांनी उद्यानकन्यांचे कौतुक केले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.