धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा उत्साहात संपन्न!
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने
आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, म्हसवड महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा आज, ३० ऑगस्ट २०२६ रोजी राधिका मंगल कार्यालय, सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले (सर) होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर (सर) यांच्या हस्ते झाले.
वधू-वर परिचय मेळाव्यादरम्यान पालक व वधू-वरांना
व्याख्याते रविंद्र कोकरे (सर), प्राथमिक शिक्षक बँकेचे मा. व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर (सर), संस्थेचे अध्यक्ष राहुल मासाळ साहेब तसेच राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अरविंद सुळ, युवा नेते बाबासो वाघमोडे, पत्रकार सचिन टेळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भिसे, युवा नेते भानुदास शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते विकास कचरे, सामाजिक कार्यकर्ते अमेय कुंडलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थितांचे आभार वंचित बहुजन आघाडी फलटण तालुक्याचे युवा नेते निवृत्ती खताळ (सर) यांनी मानले.
धनगर समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा आणि पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या सामाजिक उद्देशाने आयोजित हा मेळावा समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.
Comments
Post a Comment