एक गाव एक ताईच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार व फलटण तालुका अध्यक्षपदी सौ. रझिया शेख यांची नियुक्ती.

एक गाव एक ताईच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार व फलटण तालुका अध्यक्षपदी सौ. रझिया शेख यांची नियुक्ती.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण, दि. १६ ऑगस्ट २०२६ : रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने ‘एक गाव एक ताई’ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पदाधिकारी व प्रतिनिधींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख व सचिव श्री. मारुती टकले यांच्या उपस्थितीत ‘एक गाव एक ताई’ संस्थेचे संचालक श्री. विश्वाजीत भगवान मुनेश्वर, श्री. योगेश शेलार, श्री. अनिल देसाई, श्री. अमित बोडके, श्री. नंदकुमार खिरे तसेच सौ. वर्षा सपकाळ – सातारा जिल्हा प्रतिनिधी, सौ. मीनल खिरे – विभाग प्रतिनिधी, सौ. चित्रा झिरपे – सातारा तालुका प्रतिनिधी, सौ. वैशाली गुजर – खटाव तालुका प्रतिनिधी, सौ. मुक्ता चव्हाण – सातारा तालुका प्रतिनिधी, सौ. मृणाली जगदाळे – कोरेगाव तालुका प्रतिनिधी, सौ. अश्विनी कांबळे – कराड तालुका प्रतिनिधी, सौ. सुषमा चव्हाण – सातारा लीडर तालुका तसेच ‘एक गाव एक प्रतिनिधी’चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
या सर्वांचा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फलटण तालुक्यातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सौ. रझिया शेख यांची ‘एक गाव एक ताई’ संस्थेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीमुळे फलटण तालुक्यातील महिलांना सौ. रझिया शेख यांच्या माध्यमातून विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, या निर्णयामुळे तालुक्यातील महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था आणि ‘एक गाव एक ताई’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून फलटण तालुक्यातील अधिकाधिक महिलांना रोजगाराच्या प्रवाहात आणून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.