राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विश्वंभर रणवरे सर्वगुण संपन्न नेतृत्व-रामचंद्र जाधवसर.

राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विश्वंभर रणवरे सर्वगुण संपन्न नेतृत्व-रामचंद्र जाधवसर.

पुसेगाव/प्रतिनिधी, पंकज कदम.

राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील श्री विश्वंभर रणवरे हे सर्व गुण संपन्न नेतृत्व आज आपल्या सेवेनंतर त्यांचा सेवेचा कार्यकाल संपला त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम करण्यात आला. आता सेवा संपली नसून आता  खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचे भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस रामचंद्र जाधव सर यांनी आपले मत व्यक्त केले. वडूज ता. खटाव येथे स्वयंवर मंगल कार्यालय येथे श्री विश्वंभर रणवरे यांच्या सेवापूर्ती समारंभ घेण्यात आला. यावेळी सामाजिक राजकीय व शैक्षणिक परिवारातील त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामचंद्र जाधव सर  पत्रकारांशी बोलताना म्हणाले रणवरे सर हे एक शैक्षणिक क्षेत्रातील महागुरु होते तसेच त्यांनी सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा चे व्हाईस चेअरमन, जिल्हा परिषद केंद्रशाला सिद्धेश्वर कुरौली मुख्यध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा सर्व कार्यकाल हा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तसेच शिक्षकांच्या सेवेसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून घालवला आणि ते आता प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. परंतु सेवानिवृत्त ही कधी होत नसते.. तर ती तिथून पुढे कार्यशील होत जाते.इथून पुढील काळातही विश्वंभर रणवरे सर हे सर्वत्र कार्यशील राहतील अशी आशा व्यक्त केली. वडूज या ठिकाणी त्यांचा सेवापुर्ती समारोह संपन्न झाला या सोहळ्यास शिक्षक समितीचे राज्य नेते श्री उदयराव शिंदे, माझी केंद्रप्रमुख एस के जाधव, जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस श्री विठ्ठलराव फडतरे, शिक्षक बँकेचे माझी चेअरमन श्री किरण यादव, फलटण येथील शिक्षक समिती महिला तालुकाध्यक्ष तसेच शिक्षक समिती व जिल्ह्यातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.