खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' सिद्धाली शहा यांचा विशेष सत्कार.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' सिद्धाली शहा यांचा विशेष सत्कार.

जलमंदिर पॅलेसवर महाराजांकडून कौतुकाचा वर्षाव; 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'मधील जागतिक कामगिरीबद्दल दिल्या शुभेच्छा.

फलटण प्रतिनिधी:जुबेरभाई कोतवाल 

फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांची 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'च्या वतीने 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' म्हणून अधिकृत नोंद झाल्याबद्दल सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.

सिद्धाली शहा यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी अवघ्या २१ वर्षे, १० महिने आणि ५ दिवस वयात नगरसेवक पदाची धुरा सांभाळत हा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. या अद्वितीय कामगिरीचे कौतुक करताना, "आपल्या कर्तृत्वाचा हा गौरव असाच वाढत राहो आणि आपल्या हातून समाजसेवेचे उत्तम कार्य घडो," अशा शब्दांत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सिद्धाली शहा यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे प्रमाणपत्र बहाल झाल्याने फलटण शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सत्काराच्या प्रसंगी सातारा येथील नगरसेवक शंकर माळवदे, सुनिल काटकर, फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा, माऊली फाउंडेशनच्या विश्वस्त मिनाक्षी लाळगे आणि आशिष लाळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.