जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका सिद्धाली शहा यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते सन्मान.

जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका सिद्धाली शहा यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते सन्मान.

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद; पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

फलटण प्रतिनिधी : जुबेर कोतवाल.

जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याबद्दल फलटण नगरपरिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच सन्मान करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कु. सिद्धाली शहा यांनी अत्यंत कमी वयात नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून नगरसेविका म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या जागतिक विक्रमामुळे फलटणसह सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातही कौतुक व्यक्त होत आहे.
या कामगिरीचे कौतुक करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “फलटणसारख्या निमशहरी भागातून मुली राजकारणात पाऊल टाकत आहेत आणि नेतृत्व करत आहेत, ही खरोखरच मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आमचे जुने मित्र आणि माजी नगरसेवक अनुप शहा यांनी आपल्या कन्येला राजकारणात सक्रिय करून समाजासमोर एक नवा आणि सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे.”

आजच्या काळात तरुण पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यातही मुलींनी नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे ही समाजाच्या दृष्टीने सकारात्मक बाब असल्याचेही शेट्टी यांनी नमूद केले.
सिद्धाली शहा यांच्या या उल्लेखनीय जागतिक विक्रमाबद्दल राजू शेट्टी यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सत्कार प्रसंगी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.