"कोर्टकेस नुसार संगणकाची रक्कम परत देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे शिक्षण संचालकाना आदेश"
सोनवडी प्रतिनिधी,नासिर शेख.
आज दि.8/8/2026रोजी शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बोराटवाडी ता.माण जि. सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत संघटनेचे पदाधिकारी यानी भेट घेवून निवेदन दिले व चर्चा केली.तसेच मंत्री जयकुमार गोरे यानी शिक्षण संचालक शरद गोसावी याना संगणक रक्कम परत देण्याचा लेखी आदेश देवून व फोनवरुन चर्चा केली.सदरची रक्कम देण्याचे संचालक यानी मान्य केले.हे या संघटनेचे फार मोठे यश आहे. आजच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या 5 हजार ते 6 लाख रु.पर्यंतच्या संगणक रकमा कोर्ट निर्णयानुसार लवकरच परत मिळतील. यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.ए. खाडे यांचे बंधू व भाजप कोअर कमिटीचे सदस्य सदाशिव खाडे व राज्य अध्यक्ष मधुकर जंगम यानी मंत्री याना सविस्तर माहिती दिली.या चर्चेत जिल्हाअध्यक्ष मा.ए. खाडे,राज्य उपाध्यक्ष गजानन डाके,विभागीय संघटक कल्पना यादव,तालुकाअध्यक्ष आनंद ओंबासे,तालुकाअध्यक्ष अरुण गोसावी,कडेगाव तालुकाअध्यक्ष लक्ष्मण महापूरे, सरचिटणीस आण्णासो शेवते,उपाध्यक्ष कृष्णत कुंभार,रमेश जंगम, विश्वनाथ कुंभार, रामचंद्र माने,शंकर कांबळे,नारायण आवळे,श्रीमंत वाघमारे, माध्य.शिक्षक शंकर पालखे, प्रकाश तपासे यानी सहभाग घेतला.यामुळे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची काम करण्याची धडाडी अधोरेखीत झाली.
Comments
Post a Comment