वर्धनगड घाटातील दाब हरण कुंड ( आउटलेट ) बंद करण्याचा जिहे कटापूर उपसा सिंचन अधिकारी यांचा प्रयत्न ग्रामस्थांसह महिलांनी हाणून पाडला.
( आउटलेट ) बंद करण्याचा जिहे कटापूर उपसा सिंचन अधिकारी यांचा प्रयत्न ग्रामस्थांसह महिलांनी हाणून पाडला ;
सातारा 24 तास न्यूज.
पुसेगाव प्रतिनिधी.पंकज कदम.
वर्धनगड घाटातील जिहे कटापूर योजनेच्या आऊटलेट वॉल्व( दाब हरण कुंड ) मधून वेस्टेज जाणारे पाणी रामोशीवाडी ता. कोरेगाव तलावात जाऊन तो तलाव भरल्या कारणाने तलावाच्या पाण्याचे परक्यूलेषणमूळे तलावाच्या खालील असणाऱ्या विहिरीला पाणी राहून तसेच खाली असणाऱ्या नाला बिल्डिंग या भरून राहिल्या कारणाने रामोशी वाडी भाटमवाडी सह चिमणगाव पर्यंतच्या विहिरींना पाणी राहण्यासाठी मदत होत होती या पाण्याच्या माध्यमातून विहिरीला पाणी राहून पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांच्या पाण्याची सोय उपलब्ध होत होती,परंतु जिहे कटापूर योजनेच्या अधिकाऱ्यांनी आउटलेट जाणारे पाणी बंद करण्यासाठी आज वर्धनगड घाटातील वॉल्व वेल्डिंग करून पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता व हे वॉल्व बंद करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेतले होते. या वाल्व बंद निर्णया विरोधात आज रामोशी वाडी भाटमवाडी तसेच चिमणगाव येथील ग्रामस्थासह महिलांनी जोरदार विरोध करून जीहे कटापूर योजना अधिकारी व पोलिसांना परत जाण्यास भाग पाडले.जिहे कटापूर योजनेचे पाणी येथील पिण्याचे पाणी जनावरांचे पाणी व शेतीसाठी मिळावे यासाठीरामोशीवाडी,भाटमवाडीग्रामपंचायतीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार कोरेगाव, जिहे कटापूर उपसा सिंचन विभाग,तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांना यापूर्वी निवेदनाद्वारे या योजनेच्या माध्यमातून रामोशी वाडी भाटमवाडीसाठी शेती पाण्यासह पिण्याचे पाणी मिळावे यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले असल्याचे सरपंच केशव मदने यांनी सांगितले व तशा आशयाची पत्रे सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत परंतु वारंवार मागणी करून देखील रीतसर मार्गाने या योजनेचे पाणी आज पर्यंत आम्हाला मिळाले नाही, या योजनेमध्ये आमच्या जमिनी गेल्या, त्याचे मूल्यमापन नगन्य केले गेले, अगदी अल्प, मदत कोणाला मिळाली तर अनेकांना मिळाली नाही, उभ्या पिकातून त्या काळामध्ये शेकडो एकर जमिनीतून पाठ घेण्यात आला, त्या पिकाची भरपाई देतो म्हणाले ती हीं आज परत मिळाली नाही, तसेच हा भाग पूर्वंपार दुष्काळी असून या दोन वाड्यांना कुठलाही पाण्याचा सोर्स नाही, आणि या योजनेनंतर कुठलीही योजना केवळ दोन गावासाठी येऊ शकत नाही, आउटलेट मधून जाणारे वेस्टेज पाणी या पाण्यावर आमची तहान भागत होती गेले दोन वर्ष हे पाणी आउटलेट मधून चार ते पाच वेळा सोडण्यात आले, त्या पाण्यावर बऱ्यापैकी आमच्या गावचा पिण्याचा पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता, वर्षानुवर्ष पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती चालली होती ती थांबली होती. परंतु अचानकच जिहे कटापूर उपसा सिंचन अधिकाऱ्यांनी आउटलेट वोल्व बंद करण्याचा घेतलेला निर्णय या दोन-चार गावावर अन्यायकारी असून या अन्यायाविरोधात आज वाल्व बंद करण्यात पोलीस प्रोटेक्शन सह आलेल्या जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना येथील महिला व ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला व व्हॉल्व वेल्डिंग करण्यापासून रोखले या जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठीची समस्येची तळमळ व होणारा विरोध पाहून जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने काढता पाय घेतला. हे व्हॉल्व बंद करू नये म्हणून दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत महिला वर्ग तरुण वर्ग तसेच शेकडो ग्रामस्थ या वाल्व बंदी विरोधात उभे होते. सदर यावेळी जिहे कटापूर योजनेचे अधिकारी महाजन साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराजदार साहेब,कदम साहेब, तसेच महिला पोलिसासह अनेक पोलीस उपस्थित होते, या दरम्यान उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे साहेब या ठिकाणी परिस्थितीची पाहणी केली व मार्गदर्शक सूचना करून रवाना झाले.
[ दाब हरण कुंड फ्लेश वाल्व मधून वेस्टीज जाणारी पाणी या पाण्याच्या माध्यमातून चार-पाच गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो फेब्रुवारी महिन्यापासूनच या गावाला टँकर मागणी होते ही टँकर मागणी थांबून या दोन वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटला होता.परंतु राजकीय द्वेषातून खऱ्या अर्थाने हा वाल्व बंद करण्याचा निर्णय घेतला गेला, प्रशासनाला विनंती आहे या गावच्या अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या शासनाने येथील लहान मुले महिलांची दखल घेऊन या लोकांना न्याय द्यावा व येथील जनतेला मदत करावी.- माजी सभापती राजाभाऊ जगदाळे कोरेगाव ]
[या तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी आहेत या दोन्हीही लोकप्रतिनिधींनी रामोशी वाडी भाटमवाडी येथील पाण्याच्या बाबतीत लक्ष घालावे यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण आणू नये या आउटलेट पाण्याच्या वाल्व माध्यमातून येथील वाड्यांचा दुष्काळ हटत आहे. आणि हे व्हॉल्व बंद करून जनतेच्या जीवाशी खेळू नये अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील - भाटमवाडी सरपंच मोहनराव जाधव ]
[गेली कित्येक वर्ष या गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. जिहे कटापूर योजनेचे पाणी खटाव मान साठी जात असताना गेली दहा ते बारा वर्षे सातत्याने या योजनेतून पाणी मिळावे म्हणून मागणी केली आम्ही मिळेल त्याला प्रत्येक प्रतिनिधींना तसेच तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस असताना त्यांनाही निवेदन देण्यात आले होते व त्यांनी दखल घेऊन येथील परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले होते, याप्रमाणे अनेकांना आम्ही निवेदन देण्याचा प्रयत्न केला आमची मागणी एवढीच होती आमच्या वाढ वडिलांनी दुष्काळ बघितला त्यांचं जीवन दुष्काळात गेलं आज आमचं निम्म जीवन दुष्काळातच चालले आहे, परंतु आमची नवी पिढी आहे ती तरी पिढी आनंदित जगावे त्यांचे जीवन सुख समाधानात जावे आणि म्हणूनच आम्ही ही मागणी वारंवार करीत आलो आहे. आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी स्कोर व्हॉल्व बसवून आम्हाला या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि आता तेच पाणी बंद करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा चालू आहे. आम्हालाही इतर प्रमाणे प्यायला पाणी असावे शेतीला पाणी असावं असे वाटत नसेल का? असा प्रश्न उपस्थित केला - रामोशीवाडी सरपंच केशव मदने.
Comments
Post a Comment