महिलांच्या आरोग्याची काळजी हीच महिला दिनाची शुभेच्छा : वैशालीताई शिंदे.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव - दि. ८ : नगरपंचायती मध्ये सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत अनेक विधायक उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या संजीवनी बर्गे यांनी महिलांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेत आयोजित केलेले आरोग्य शिबीर हीच आजच्या महिला दिनाची एक सुंदर भेट असल्याचे प्रतिपादन सार्थक महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा वैशालीताई शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.कोरेगाव नगरपंचायतीच्या विरोधीपक्ष नेत्या संजीवनी सचिन बर्गे व मा.नगरसेवक सचिन भैय्या बर्गे यांचे सौजन्याने कोरेगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी सौ. शिंदे बोलत होत्या.कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संजनाताई जगदाळे, तालुका अध्यक्ष प्रतिभाताई बर्गे, माजी उपनगराध्यक्षा मंदाताई बर्गे, संगीताताई बर्गे, नगरसेविका मोनिका धनावडे आदी उपस्थित होत्या.प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरोधीपक्ष नेत्या संजीवनी बर्गे यांनी केले, सूत्रसंचालन धनश्री अजित बर्गे यांनी तर आभार कांचन प्रीतम बर्गे यांनी मानले.
कराडच्या स्वामी सामाजिक संस्था व युवा मोरया सामाजिक संस्था सातारा यांच्या आरोग्य टीमने ११३ महिलांची तपासणी केली. या टीम मधील डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. संगीता थोरात, देव पाटील, दत्तात्रय देशमुख, विक्रांत देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमास वंदना शिंदे, सुनिता बर्गे, माधुरी मालुसरे, अपर्णा चिनके, अश्विनी बर्गे, दीपावली पाटील, ॲड. शुभांगी बर्गे, उमा नलावडे, अंजना बर्गे, जयश्री झांजुर्णे, रंजना साळुंखे, संगीता बर्गे, जयश्री बर्गे, मनीषा बर्गे, संजीवनी मोरे, गोकुळा कुंभार, रेखा बर्गे, सविता बर्गे, मीना बर्गे, साधना बर्गे, वनिता बर्गे, मंगल पवार, सुवर्णा घाडगे, मालन लांडगे, शीतल बर्गे यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस, वेताळ गल्ली टेक, सम्राटगल्ली, भैरवनाथ मंदिर परिसर, बाजारपेठ, हनुमान घाट, जानाई गल्ली, व्यापरपेठ तसेच कोरेगांव शहरातील विविध भागातील महिलांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment