महिला दिनानिमित्त काशीळ येथे महिला मेळावा घेऊन घर दोघांचे जाणीव जनजागृती कार्यक्रम उत्सहात संपन्न.
सातारा 24 तास प्रतिनिधी, पंकज कदम.
या कार्यक्रम प्रसंगी गावातून रॅली काढण्यात आली. तसेच डॉ. पल्लवी साठे यांनी महिलांना आरोग्य तसेच आहार विषयी व महिलांच्या आरोग्याची काळजी हीच महिला दिनाच्या शुभेच्छा असे सांगत मार्गदर्शन केले. तर मा.DCO सर यांनी महिला दिन का साजरा केला जातो तसेच संयुक्त मालकी हक्क का महत्वाचे तसेच माविमच्या माध्यमातून राबवल्या जाणार्या योजना, स्मार्ट प्रकल्प तसेच तसेच महिलांना माल विक्री साठी पॅकिंग लेबलिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. महिलांचा उत्पादन केलेला माल लवकरच विक्री सेंटर ला ठेऊ. आज महिलांनी सर्व बँकांचा विश्वास कमवला आहे. ही खुप कौतुकास्पद गोष्ट आहे महिलांनी आलेल्या संधीचा फायदा घ्यावा महिलांनी शासन योजनेचा लाभ घ्यावा. Dcc च्या तरडे सर व फरांदे सर यांनी महिलांनी विमा काढणे किती महत्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले. तसेच मा. भरत माने सर यांनी महिलांना उद्योग व्यवसाय साठी प्रशिक्षणासाठी आम्ही पुर्ण मदत करू यावर सर्वानी मार्गदर्शन केले. तसेच आदर्श ग्रामसंघ काशीळ या संघातील 10 महिलाना Vsp अंतर्गत दीड लाख रुपयाचा धनादेश संघाला देण्यात आला. तर सहारा ग्राम संघ सासपडे या संघाला 8 महिलांना साठी 1 लाख 20 हजार रुपयेचा धनादेश देण्यात आला. त्याचबरोबर याा कार्यक्रम प्रसंगी येथील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मधील विद्यार्थी यांनी राज्यस्तरीय बस्केटबॉल स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आल्याने व राज्यस्तरीय 26 जानेवारी परेडमध्ये निवड झालेल्या्या्या निवड झालेल्या दोन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी महिलांचा देखील सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन महिला मेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.
Comments
Post a Comment