कोरेगावात स्वीकृत नगरसेवकपदी रशीद शेख यांची बिनविरोध निवड; गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव.

कोरेगावात स्वीकृत नगरसेवकपदी रशीद शेख यांची बिनविरोध निवड; गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. 

कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक रशीद शेख यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नगरपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक ॲड. शशिकांत क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगरसेवकपद रिक्त झाले होते. जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. सोमवारी अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. रशीद शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
नगरपंचायत कार्यालयात झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक पदी रशीद शेख यांची निवड झाली असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे,  नगरसेवक साईप्रसाद बर्गे,साहेब युवा मंचचे अध्यक्ष विजय घोरपडे यांच्यासह नगरसेवकांनी रशीद शेख यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
कोरेगाव ग्रामपंचायतीचे शिल्पकार स्वर्गीय बुवासाहेब बाळासाहेब बर्गे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून रशीद शेख यांनी समाज बांधवांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. शिवतीर्थ हुतात्मा स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, आमदार महेश शिंदे यांचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या. नगरपंचायत कार्यालयापासून गुलालाच्या उधळणीत रशीद शेख यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.