रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) यांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी सो यांना दिले निवेदन.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) यांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) महाराष्ट्र राज्य उपअध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष, तसेच जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ धोत्रे, कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, व अल्पसंख्याक कोरेगाव ता. अध्यक्ष शौकत कुरेशी यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे नमूद करण्यात आले, सुशिक्षित बेरोजगारांसाठी महा-ई-सेवा केंद्र त्वरित द्या
गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे स्वयंरोजगार करण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असतात. त्यांनी व्यावसायिक कोर्स केलेले असलेल्या पात्र उमेदवारांनी आपल्या कार्यालय मद्ये अनेक वेळा महा-ई-सेवा केंद्रासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु या कार्यालयाने महा ई सेवा केंद्र जागा प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध असताना सुद्धा त्यांना ते मिळत नाहीत, तरी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अनेक बेरोजगारात तरुणांसाठी विभागावर महा-ई-सेवा केंद्रा वर पूर्तता आहे परंतु तालुक्याच्या स्तरात सुद्धा महा-ई-सेवा केंद्र कमी प्रमाणात दिसून येतात त्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी मग त्यामध्ये अनेक प्रकारच्या बहुजन समाज, तसेच मागासवर्गीय अल्पसंख्याक इत्यादी, समाजातील तरुण-तरुणी यासाठी मागणी करत आहेत. परंतु त्यांची पात्रता बघून व त्यांना त्याबाबत लवकरात लवकर त्यांचे अर्ज मान्य करण्यात यावेत, प्रत्येक तालुका मधील कोरेगाव असेल खटाव कराड येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांनी अर्ज केले होते, तरी त्याच आपल्याकडून कुठल्याही प्रकारची कागदोपत्री हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांचे रोजी रोटीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे संबंधितांना उपासमारीची वेळ येत असल्यामुळे या बाबीचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्याबाबत त्वरित योग्य तो निर्णय होऊन संबंधितांना महा-ई-सेविकांद्राची मान्यता देण्यात याव्या. येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष दादासाहेब  ओव्हाल, युवक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ धोत्रे साहेब तसेच कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी व अल्प संख्याक कोरेगाव तालुका अध्यक्ष शौकत कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली जर लवकरात लवकर मंजूरी न  दिल्यास, सातारा जिल्हा कार्यालय समोर व प्रत्येक तालुक्यातील तहसिल कार्यालय समोर शासनाचे लक्ष वेधण्याकरता लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल.असा इशारा या निवेदना द्वारे देण्यात आला आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.